शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खुनात जामीन; दरोड्यात अडकले; खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना सातारा पोलिसांनी केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 16:00 IST

या आरोपींचा सातारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या दरोड्याच्या गुन्ह्यात सहभाग आढळल्यामुळे त्यांना शुक्रवारी सायंकाळी अटक करण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगर : मुकुंदवाडी परिसरातील खुनाच्या गुन्ह्यातील पाच आारोपींना तांत्रिक मुद्याच्या आधारावर न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला. शहर पोलिसांनी सातारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यात खुनातील पाचही आरोपींना अटक केल्याची माहिती पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी दिली.

आरोपींमध्ये मस्तान उर्फ नन्ना हुसेन कुरेशी (२९, रा. मुकुंदवाडी, इंदिरानगर), समीर खान सरताज खान (१९, रा. ग.नं.११, मिसारवाडी), बाबर शेख अफसर शेख (३२, रा. मच्छी मार्केट, मुकुंदवाडी), साजीद कुरेशी उर्फ सज्जू अहमद कुरेशी (२९, रा. ग.न.१, अंबिकानगर, मुकुंदवाडी) आणि नासिर खान मोहम्मद मुनीर खान (२०, रा. मुकुंदवाडी) यांचा समावेश आहे. गंभीर जखमी दत्ता जाधव यांनी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार पाच आरोपींसह एका अल्पवयीन तरुणाच्या विरोधात मुकुंदवाडी येथील खुनासह ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुरुवारी मध्यरात्रीनंतर गुन्हा नाेंदविण्यात आला होता. एमआयडीसीसह गुन्हे शाखेच्या पाेलिसांनी सहा आरोपींना रातोरात ताब्यात घेत शुक्रवारी सकाळी ६ वाजता अटक केली. ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा असल्यामुळे तपास सहायक पोलिस आयुक्त सुदर्शन पाटील यांच्याकडे देण्यात आला. पाच आरोपींना शुक्रवारी दुपारनंतर न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना तांत्रिक मुद्याच्या आधारावर जामीन मंजूर करण्यात आला.

या आरोपींचा सातारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या दरोड्याच्या गुन्ह्यात सहभाग आढळल्यामुळे त्यांना शुक्रवारी सायंकाळी अटक करण्यात आली आहे. या आरोपींना शनिवारी (दि. २१) न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी दिली.

उच्च न्यायालयात अपील करणारखुनासह ॲट्रॉसिटी कायद्यानुसार दाखल गुन्ह्यात पाच आरोपींना जिल्हा न्यायालयाने तांत्रिक मुद्याच्या आधारे जामीन मंजूर केला आहे. या निर्णयाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अपील दाखल करण्यात येणार आहे. सदरील आरोपींचा सातारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत पडलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झालेला आहे. त्यामुळे पाचही आरोपींना अटक केलेली आहे.- प्रशांत स्वामी, पोलिस उपायुक्त, शहर पोलिस

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी