शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

गावाचा रस्ता खराब? मग ‘लाल परी’ला ‘रामराम’; पावसाळ्यात अनेक गावांत बस बंद होण्याची भीती

By संतोष हिरेमठ | Updated: June 12, 2023 19:35 IST

वर्षभर नुकसान अन् पावसाळ्यात वाढतो अपघाताचाही धोका

छत्रपती संभाजीनगर : ग्रामीण भागांतील खड्डेमय रस्त्यांमुळे वर्षभर एसटी बसचे नुकसान तर होतेच. मात्र, पावसाळ्यात अशा रस्त्यांवरून धावताना अपघाताचीही भीती वाढते. परिणामी, प्रवाशांचा जीव धोक्यात येतो. त्यामुळे अशा खराब रस्त्यांची यादीच एसटी महामंडळाकडून केली जात आहे. ज्या गावांचा रस्ता खराब, त्या गावातील बससेवा पावसाळ्यात बंद होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

एसटी महामंडळाकडून राज्यभरात आगारनिहाय खराब रस्त्यांची माहिती घेतली जात आहे. हे खराब रस्ते ज्यांच्या अंतर्गत आहेत त्यांना देखभाल-दुरुस्तीसंदर्भात कळविण्यात येणार आहे. शहरातील सिडको बसस्थानकातून बहुतांश बस या मुख्य रस्त्यांवरून धावतात. मात्र, मध्यवर्ती बसस्थानकातून ग्रामीण भागासाठी सर्वाधिक बस धावतात. ग्रामीण भागातील रस्ते खराब असण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.

सिडको बसस्थानकाची स्थितीएकूण बस - ८८ दररोज एकूण फेऱ्या - १५२ ------मध्यवर्ती बसस्थानकाची स्थितीएकूण बस - १२२ दररोज एकूण फेऱ्या - २१० ----खराब रस्त्यांचा बसला असा फटका- इंधन जास्त लागणे.- पाटे (स्प्रिंग) तुटण्याचा प्रकार.- हँगर तुटण्याचे प्रकार.-बसची बाॅडी खिळखिळी होणे.

चालकांनी मध्यवर्ती बसस्थानक आगाराला दिलेली माहितीबससेवा : रस्त्याची अवस्था- छत्रपती संभाजीनगर ते तपोवन : वासडी ते तपोवन अरुंद रस्ता. रस्त्यात खूप खड्डे. साधारण १० कि.मी.- छत्रपती संभाजीनगर ते राजूर : जातेगाव फाटा ते टाकळीपर्यंत रस्ता खराब. मोठे खड्डे, साधारण २५ कि.मी.- छत्रपती संभाजीनगर ते बोलठाण : गाजगाव-साकेगाव-बोलठाणपर्यंत अरुंद रस्ता. रस्ता अत्यंत खराब.- देवगावरंगारी ते गाजगाव नवीन रस्त्याचे काम सुरू.- छत्रपती संभाजीनगर ते दिगाव : खामगाव ते नाचनवेल फाटा एकेरी रस्ता. ठिकठिकाणी रस्ता अत्यंत खराब.- छत्रपती संभाजीनगर ते मुर्डेश्वर : गिधाडा घाट अत्यंत खराब. गिधाड गावाजवळ २ कि.मी. रस्ता खराब.- छत्रपती संभाजीनगर ते जातेगाव : बिल्डा ते चिंचोली घाट रस्ता खडबडीत आहे.- छत्रपती संभाजीनगर ते बोडगा, लोणी : टाकळीपासून २ कि.मी. पुढे खराब रस्ता.

बसचे नुकसानखराब रस्त्यांमुळे एसटी बसचे नुकसान होते. स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन रस्ते सुधारण्यासाठी प्रयत्न करावा. बससेवेची मागणी केली जाते. त्यादृष्टीने रस्तेही चांगले पाहिजेत, याची खबरदारी घेतली पाहिजे.-श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेस

यादी कार्यालयाला देणारखराब रस्त्यांची यादी तयार केली जात आहे. ही यादी तयार होताच पुढील कार्यवाहीसाठी ती विभाग नियंत्रक कार्यालयास सादर केली जाईल.-लक्ष्मण लोखंडे, आगार व्यवस्थापक, मध्यवर्ती बसस्थानक

टॅग्स :state transportएसटीAurangabadऔरंगाबादRainपाऊस