शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

खराब रस्ता, गाईडचा अभाव तरी पर्यटकांचा अजिंठा लेणीकडे ओढा; रविवारी ५ हजारांवर भेटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 19:48 IST

परिवहन विभागाला मिळाले १ लाखाचे उत्पन्न; वाहतुकीला अडथळे, गाईडची टंचाई ठोस उपायांची मागणी

सिल्लोड : मागील काही दिवसांपासून अजिंठा लेणी परिसराचे सौंदर्य हिरवाईने फुलले असून, पर्यटकांना आकर्षित करत आहे. रविवारी तब्बल ५ हजारांहून अधिक पर्यटकांनी लेणीला भेट दिली. या गर्दीमुळे परिवहन विभागाला तब्बल १ लाखाचे उत्पन्न मिळाले. मात्र, वाहनांच्या मोठ्या गर्दीमुळे फरदापूर टी पॉइंटवरील पार्किंग परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

सध्या अजिंठा लेणी परिसरात धबधबा फारसा वाहत नसला, तरी निसर्गरम्य वातावरण पाहण्यासाठी शनिवारी, रविवारी आणि मंगळवारी पर्यटकांची मोठी उपस्थिती असते. सोमवारी लेणी बंद असल्याने इतर दिवसांमध्ये पर्यटकांची संख्या सुमारे अडीच ते तीन हजारांपर्यंत असते. रविवारी सुमारे पाच हजारांवर पर्यटकांनी लेणी पाहण्यासाठी गर्दी केली होती. या पर्यटकांची ७ एसी आणि २ नॉन-एसी बसगाड्यांद्वारे फरदापूर टी पॉइंटहून लेणीपर्यंत ने-आण करण्यात आली, ज्यातून १ लाखांचे उत्पन्न मिळाले.

मधमाश्यांच्या हल्ल्यानंतर सुधारणा, वाढला पर्यटकांचा ओढामार्च, एप्रिल, मे महिन्यात लेणी क्रमांक १० व ४ च्या माथ्यावरील मध माशांच्या पोळाने ७०० पेक्षा अधिक पर्यटक जखमी केले होते. त्यामुळे पर्यटकांची संख्या कमालीची घटली होती. ‘लोकमत’ने याबाबत वृत्त मालिका प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत पुरातत्व विभागाने जूनमध्ये येथील मधाचे सर्व पोळे हटवले, त्यानंतर पर्यटक पुन्हा लेणीकडे वळू लागले आहेत.

गाईड नाही, माहिती नाही !सध्या लेणी परिसरात केवळ दोन गाईड कार्यरत आहेत. तेही अनेकदा उपलब्ध नसतात. यामुळे पर्यटकांना लेणी, चित्रे पाहूनच माघारी फिरावे लागते. पुरातत्व विभागाने तंबी दिल्यापासून चौकीदार माहिती देत नाहीत. गाईडअभावी लेणीचा ऐतिहासिक वारसा, कथा, गौतम बुद्ध यांच्याशी संबंधित अपेक्षित माहिती पर्यटकांना मिळत नाही. पर्यटकांचा ओघ बघता किमान १० ते १५ गाईड नेमावेत, अशी मागणी होत आहे.

घाटात वाहतुकीची कोंडी, पर्यटक वैतागलेसिल्लोड शहरातील आंबेडकर चौकात व भवन गावातील पूर्णा नदीवर सुरू असलेल्या कामामुळे, तसेच अजिंठा घाटात अरुंद रस्त्यांमुळे वाहतूक वारंवार ठप्प होते. रविवारीही अजिंठा घाट व आंबेडकर चौकात दुपारी ३ ते ४ वाजेदरम्यान एक तास वाहतूक ठप्प झाली होती, त्यामुळे पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरtourismपर्यटन