शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंत्र्यावर बिबटे सोडा', उद्या पाकिस्तानातील लोक मंत्री म्हणून येतील', सुधीर मुनगंटीवारांचा विधानसभेत पारा चढला!
2
पडळकर-आव्हाड समर्थक राडा प्रकरणी अहवाल सादर; "'त्या' कार्यकर्त्यांना २ दिवस कारावास अन्..."
3
तंबाखू आणि सिगारेट महागणार! केंद्र सरकारकडून उत्पादन शुल्कात ५ पट वाढ; नवीन किंमत काय असेल?
4
विधानसभेत मंत्री नितेश राणेंची कोपरखळी; "काल चिडलेले होते, वैयक्तिक भेटले तर मिठीही मारतात..."
5
पहिला अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तानच्या मुलीची पंतप्रधानांना साद; 'माझ्यावर वारंवार बलात्कार, मदत करा, न्याय द्या'
6
रिस्क है तो...! कार डीलरचा मुलगा ते शेअर बाजाराचा 'बिग बुल'; हर्षद मेहताचा 'वाद'ळी प्रवास
7
“श्रमलेल्या बापासाठी लेक...”; शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रिया सुळेंची खास पोस्ट
8
रुपयाचा ऐतिहासिक नीचांक! डॉलरच्या तुलनेत दर ९०.५६ रुपये; घसरण्याची ३ मोठी कारणे समोर
9
एकाच रिचार्जमध्ये मिळणार वाय-फाय, फोन आणि डीटीएच, हा प्लान खूप खास
10
Video - "तुला लाज वाटली नाही?"; नवऱ्याने बायकोला बॉयफ्रेंडसोबत OYO मध्ये रंगेहाथ पकडलं अन्...
11
मुलानं आईला मारलं, मग स्वतःलाही संपवलं; ChatGPT कारणीभूत? OpenAI वर खटला!
12
Kankavli: हरवलेल्या मोबाईलमुळे ‘त्या’ प्रेमी युगुलानं संपवलं जीवन, तपासातून धक्कादायक माहिती समोर   
13
आश्चर्यकारक! Tata च्या नवीन Sierra ने दिले 30 kmpl चे मायलेज; 222 kmph चा टॉप स्पीडही गाठला
14
हिरा निघाला 'हा' शेअर; ९० टक्के फायद्यावर लिस्टिंग, IPO मध्ये लागलेली फक्त २ पट बोली
15
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, सोनं 1.34 लाख पार तर चांदी 2 लाखांच्या उंबरठ्यावर; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
16
मॅक्सिको भारतावर नाही तर आपल्याच प्रगतीवर टाळं लावतोय, फेडावी लागेल मोठी किंमत
17
कोथरुडमध्ये मिळू लागले अवघ्या ८६ रुपयांना लीटर पेट्रोल; वाहनचालकांची उडाली झुंबड...
18
China Condom Tax: चीनमध्ये कंडोमवर भरपूर टॅक्स लादणार, जिनपिंग यांच्या धोरणाला विरोध का होतोय?
19
प. बंगालमध्ये आता बांधले जाणार राम मंदिर; भाजपा नेत्यांनी लावले पोस्टर, देणगी देण्याचे आवाहन
20
विनेश फोगाटचा यू-टर्न! पुन्हा कुस्तीच्या आखाड्यात परतणार, निवृत्तीचा निर्णय रद्द, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

समाजव्यवस्थेतील प्रश्नांचे एकमेव उत्तर म्हणजे बाबासाहेब आंबेडकर: न्यायाधीश के. चंद्रू

By विजय सरवदे | Updated: April 1, 2023 11:59 IST

नागसेनवनातील आजी-माजी विद्यार्थ्यांच्यावतीने आयोजित तीनदिवसीय नागसेन फेस्टिव्हलचे उद्घाटन न्यायाधीश के. चंद्रू यांच्या हस्ते मशाल पेटवून झाले.

छत्रपती संभाजीनगर :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या राज्यघटनेपेक्षा त्यांच्या इतर साहित्यातून भारतीय समाजाच्या प्रश्नांची उत्तरे मिळतात. घटना लिहिताना मर्यादा असल्यामुळे त्यांना पूर्णपणे व्यक्त होता आले नव्हते. भारतीय समाजव्यवस्थेतील प्रश्नांचे एकमेव उत्तर म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही एकमेव व्यक्ती आहे, असे प्रतिपादन ‘जयभीम’ चित्रपटाचे प्रणेते तथा मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश के. चंद्रू यांनी केले. 

नागसेनवनातील आजी-माजी विद्यार्थ्यांच्यावतीने आयोजित तीनदिवसीय नागसेन फेस्टिव्हलचे उद्घाटन न्यायाधीश के. चंद्रू यांच्या हस्ते मशाल पेटवून झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून चित्रपट अभिनेते किशोर कदम (सौमित्र) उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठीतून सिद्धार्थ मोकळे यांनी, तर इंग्रजीतून डॉ. उत्तम अंभोरे यांनी केले. चंद्रू यांचा परिचयही डॉ. अंभोरे यांनी करून दिला.

यावेळी न्यायाधीश चंद्रू म्हणाले, १९७५ साली आणीबाणीच्या काळात आणि आताच्या काळात माध्यमावर असलेली बंधने सारखीच आहेत. त्यामुळे अनेक गोष्टी बाहेर येत नाहीत. अशा परिस्थितीत लोकांनी बाबासाहेबांचा विचार समजून घेतला पाहिजे. आता सध्या अमेरिकेमध्ये जातीवादाचा प्रश्न उद्भवला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी १९३० च्या दशकातच याबद्दल सूतोवाच केले होते की, भारतीय माणूस जेथे जेथे जाईल, तेथे जातीचा प्रश्न उद्भवू शकतो. त्यामुळे अशा व्यवस्थेविरुध्द आपणास सजगपणे आवाज उठविणे गरजेचे आहे.

चित्रपटाचा समाजमनावर परिणामयावेळी ‘चित्रपटातील समाज वास्तव आणि वास्तवातील समाजमन’ या विषयावर किशोर कदम यांनी मनोगत व्यक्त केले. व्यावसायिक आणि वास्तववादी चित्रपटाचे हे दोन प्रकार आहेत. केवळ मनोरंजनासाठी नव्हे, तर प्रबोधनासाठीही चित्रपट असतात. समाजामध्ये वास्तवात जे घडते, ते चित्रपटातून दाखविले जाते. चित्रपटाचा समाजमनावर परिणाम होत असतो. अलीकडे जातीय व्यवस्थेवर चित्रपटातून कथानक दाखविले जाते, असे सांगून आतापर्यंत चित्रपटात केलेल्या भूमिका व राष्ट्रीय पुरस्काराची हुकलेली संधी यावर कदम यांनी भाष्य केले.

नागसेन गौरव पुरस्कारयावेळी के. चंद्रू यांच्या हस्ते भदन्त विशुद्धानंद बोधी महास्थवीर यांना धम्मचळवळीतील उल्लेखनीय कार्याबद्दल नागसेन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यासोबत डॉ. वाल्मिक सरवदे, डॉ. शंकर अंभोरे, डॉ. उमाकांत राठोड, डॉ. तुषार मोरे, के. एम. बनकर, भीमराव सरवदे, ॲड. सुनील मगरे, ॲड. सी. एस. गवई, ॲड. सिद्धार्थ उबाळे, ॲड. नितीन मोने यांचा सत्कारही चंद्रू यांच्या हस्ते करण्यात आला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरNagsen vanनागसेन वन