महावितरण कार्यालयात झाडांवर कुऱ्हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:28 IST2020-12-17T04:28:45+5:302020-12-17T04:28:45+5:30

------ रॉंग साईड वाहनांचा धोका औरंगाबाद : अदालत रोडसमोर रॉंग साईड वाहने चालविण्याचा प्रकार सुरु आहे. कोकणवाडीकडून भाग्यनगरकडे जाण्यासाठी ...

Ax on trees in MSEDCL office | महावितरण कार्यालयात झाडांवर कुऱ्हाड

महावितरण कार्यालयात झाडांवर कुऱ्हाड

------

रॉंग साईड वाहनांचा धोका

औरंगाबाद : अदालत रोडसमोर रॉंग साईड वाहने चालविण्याचा प्रकार सुरु आहे. कोकणवाडीकडून भाग्यनगरकडे जाण्यासाठी धोकादायक पद्धतीने वाहन रॉंग साईड नेले जात आहे. यातून अपघाताचा धोका निर्माण होत असल्याने हा प्रकार थांबविण्याची मागणी होत आहे.

-------------

एसटी निवासस्थानांवर

वाढली झाडीझुडपी

औरंगाबाद : समर्थनगर परिसरातील एसटी महामंडळाच्या निवासस्थानाची दुरवस्था झाली आहे. इमारतींवर जागोजागी झाडीझुडपी वाढली आहेत. त्यामुळे इमारतींना धोका निर्माण होत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी कर्मचाऱ्यातून होत आहे.

--------------

आकाशवाणी चौकात

मोकाट कुत्र्यांचा त्रास

औरंगाबाद : आकाशवाणी चौकात रस्त्यावरच कचरा टाकला जात आहे. त्यामुळे याठिकाणी रात्रीच्या वेळी मोकाट कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. अनेकदा दुचाकी वाहनांचा मोकाट कुत्रे पाठलाग करतात. त्यातून अपघाताची भिती निर्माण होत आहे.

-------------

मध्यवर्ती बसस्थानकात

बेवारसांचा आश्रम

औरंगाबाद : मध्यवर्ती बसस्थानकात बेवारस लोकांची संख्या वाढली आहे. इमारतीचा प्रवेशद्वार, पार्किंग परिसराचा आश्रय घेतला जात आहे. सामाजिक संस्था, महापालिकेने याकडे लक्ष देऊन त्यांचे पुनर्वसन करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Ax on trees in MSEDCL office