शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
2
राजीनामा-शासन भिकारी, माणिकराव कोकाटेंच्या विधानावर CM फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले...
3
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
4
“माणिकराव कोकाटेंची हकालपट्टी करण्याची हिंमत CM फडणवीस यांच्यात नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
5
Video : चाकू काढला आणि ३२ हजारांचा लेहेंगा फाडला, दुकानदाराला म्हणाला, 'तुलाही असाच फाडेन'; कल्याणमधील व्हिडीओ व्हायरल
6
Post Office मध्ये जमा करा १ लाख, मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स व्याज; चेक करा डिटेल्स
7
प्राजक्ता माळीसोबत फोटो हवा म्हणून त्याने लिफ्टच थांबवली, पुढे काय घडलं? Video व्हायरल
8
कसोटीत सर्वाधिक मेडन ओव्हर्स टाकणारे टॉप ५ भारतीय गोलंदाज!
9
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
10
अदानी-महिंद्रासह दिग्गज स्टॉक्स गडगडले! सेन्सेक्स-निफ्टी सपाट; मात्र 'या' शेअरने केली कमाल!
11
'गाढवाचं लग्न'मधील सावळ्या कुंभाराच्या खऱ्या गंगीला पाहिलंत का?, एकेकाळी होती प्रसिद्ध अभिनेत्री
12
कोंढव्यातील ‘त्या’ तरुणीवर गुन्हा दाखल; खोटी माहिती, पुरावे तयार करून पोलिसांची केली दिशाभूल
13
₹१५ वरुन ₹४५५ वर ट्रेड करतोय 'हा' शेअर; जोरदार तेजी, आता मोठा Whiskey ब्रँड खरेदी करण्याची तयारी
14
IND vs ENG: शुभमन गिल की सचिन तेंडुलकर? ३५ कसोटीनंतर कोण वरचढ? पाहा आकडे!
15
६२ वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमान निरोप घेणार; १९६५ च्या युद्धात पाकिस्तानला टक्कर दिलेली
16
स्वतःचं घर बांधण्याचं स्वप्न पाहताय? 'सेल्फ-कन्स्ट्रक्शन होम लोन' कसं मिळवायचं, व्याजासह प्रक्रिया जाणून घ्या
17
Deep Amavasya 2025: आषाढ अमावास्येला दिव्यांची आवस म्हणतात, गटारी नाही; धर्मशास्त्र सांगते...
18
ट्रेन सुटली तरीही वाया जात नाही तुमचं तिकीट...! रेल्वेचा हा नियम तुम्हाला कदाचितच माहित असेल
19
शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, मुक्ताईनगर बंद
20
Viral Video: महाकाय अजगराला जांभई देताना कधी पाहिलंय का? दृश्य पाहून तुम्हालाही भरेल धडकी...

थेट लढतीसाठी आटापीटा..!

By admin | Updated: February 6, 2017 23:11 IST

उस्मानाबाद : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी यंदा विक्रमी अर्ज दाखल झाले आहेत

उस्मानाबाद : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी यंदा विक्रमी अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी चौरंगी-पंचरंगी तर काही ठिकाणी बहुरंगी लढती होत आहेत. या पार्श्वभूमीवर मतविभाजन टाळून थेट लढती घडविण्यासाठी प्रमुख पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा रात्री उशिरापर्यंत प्रयत्न सुरू होता. या प्रयत्नांना कितपत यश आले, याचे उत्तर मात्र मंगळवारीच स्पष्ट होणार आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी रंगात आली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी १६५ जागांसाठी तब्बल १ हजार ८०३ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. या सर्व अर्जांची त्या-त्या ठिकाणच्या तहसील कार्यालयात छाननी झाल्यानंतर गटाचे १६ आणि गणाचे ३० अर्ज बाद झाले होते. त्यानंतरही बहुतांश ठिकाणी उमेदवारी अर्ज अधिक राहिल्याने पक्षनेत्यांसह उमेदवारांचीही धाकधूक वाढली आहे. या पार्श्वभूमीवर मागील पाच दिवसांपासून मतविभाजन टाळण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या नाराजांची मनधरणी सुरू होती. पक्षातील बंडखोरांना थोपविताना समविचारी पक्षाच्या इतर उमेदवारांनाचीही समजूत घालण्याचा प्रयत्न सर्वच पातळ्यांवर सुरू होता. या अनुषंगाने मिळालेल्या माहितीनुसार रात्री उशिरापर्यंत वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत चर्चा सुरू असल्याचे दिसून आले. तुळजापूर, उस्मानाबाद, कळंबमध्ये चौरंगी लढती झाल्यास त्याचा थेट फायदा राष्ट्रवादीला होवू शकतो, हे लक्षात घेऊन शक्य त्या ठिकाणी शिवसेना-काँग्रेसमध्ये छुपी युती करण्यासाठी काही नेते आग्रही होते. या अनुषंगाने उशिरापर्यंत बैठकही झाली. मात्र, त्यातील तपशील बाहेर आलेला नव्हता. असाच प्रकार उमरगा-लोहाऱ्यातही सुरू होता. तेथे काँग्रेसला रोखण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये काही जागांवर छुप्या युतीसाठी काही उमेदवारांसह नेत्यांचे प्रयत्न सुरू होते. मात्र, तेथेही उशिरापर्यंत ठोस तोडगा निघालेला नव्हता. दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत आमदार, खासदारांसह तालुक्यातील दिग्गज नेत्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना या निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे. यामध्ये तेर मतदारसंघातून आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी, विद्यमान सदस्या अर्चनाताई पाटील निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. खा. प्रा. रवींद्र गायकवाड यांचे पूत्र किरण गायकवाड हे उमरगा तालुक्यातील कुन्हाळी मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत. तेथे भाजपा-काँग्रेसशी त्यांची चुरशीची लढत होणार आहे. आ. मधुकरराव चव्हाण यांचे पूत्र बाबूराव चव्हाण यांनी तुळजापूर तालुक्यातील अणदूर जिल्हा परिषद मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तेथे राष्ट्रवादी, भाजपासोबतच शिवसेना उमेदवारही रिंगणात आहे. तर उमरगा तालुक्यातील आलूर जिल्हा परिषद मतदारसंघातून आ. बसवराज पाटील यांचे पूत्र शरण पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. तेथे शिवसेना-भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी थेट लढत होत आहे. परंडा तालुक्यात लोणी गणातून माजी आ. ज्ञानेश्वर पाटील यांचे पूत्र रणजीत पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. याबरोबरच इतरही काही मतदारसंघातील लढती दिग्गज मैदानात उतरल्याने प्रतिष्ठेच्या होत आहेत. या ठिकाणी एकास-एक लढती व्हाव्यात, यासाठी नेतेमंडळींचे प्रयत्न सुरू होते. तर काही मतदारसंघात पक्षाच्या अधिकृत उमेदवारांबरोबरच इच्छुक असलेल्यांनी बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज दाखल केलेला असल्याने त्या ठिकाणी नेमके कोण मैदानात राहते, याबाबतही रात्री उशिरापर्यंत खल सुरू होता. त्यामुळे निवडणुकीचे चित्र आता मंगळवारीच स्पष्ट होणार आहे.