शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

औरंगजेब प्रकरणाचा पर्यटनावर परिणाम; खुलताबाद-वेरूळ परिसरातील हॉटेलचे बुकींग रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 19:40 IST

मागील काही दिवसांत औरंगजेब कबरीवरुन सुरू झालेल्या वादाचा परिणाम पर्यटनावर होत आहे.

खुलताबाद ( छत्रपती संभाजीनगर) : जगप्रसिद्ध वेरूळ लेणी, बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदीर, खुलताबाद भद्रा मारूती तसेच विविध सुफी संताच्या दर्गा खुलताबाद परिसरात असल्याने या भागात कायम पर्यटकांचा राबता असतो. मात्र, मागील काही दिवसांत औरंगजेब कबरीवरुन सुरू झालेल्या वादाचा परिणाम पर्यटनावर होत आहे. यामुळे परिसरातील हॉटेल आणि लॉजिंग व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे. पर्यटकांनी आगाऊ केलेली नोंदणी रद्द करत येथे येण्याचे टाळल्याचे दिसून येत आहे.

विविध भागातील पर्यटक सध्या वातावरण कसे आहे? अशी विचारणा करूनच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पर्यटनाची आखणी करत आहेत. दरम्यान, वेरूळ, खुलताबाद परिसरात जवळपास १०० चांगल्या दर्जाच्या रिसोर्ट, हॉटेल, लॉजिंग आहेत. मात्र, औरंगजेब कबर प्रकरणा मुळे गेल्या १५ दिवसापासून आगाऊ नोंदणी धडाधड रद्द होत असल्याने सदरील व्यावसायिक चिंतातूर झाले आहेत. शिर्डी, वेरूळ, खुलताबाद, दौलताबाद, छत्रपती संभाजीनगर असे पर्यटनाचे मोठे सर्कीट असल्याने या ठिकाणी देशविदेशातून पर्यटक येत असतात. त्यामुळे हॉटेलची ऑनलाईन बुकींग महिना पंधरा दिवस अगोदर होते. मात्र, मागील काही दिवसांपासून केवळ औरंगजेब कबर प्रकरणामुळे जो वाद व गदारोळ सुरू असल्याने बुकींग रद्द होत आहेत. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक डोक्याला हात लावून बसलेले आहेत. 

अचानक बुकींग रद्दखुलताबाद येथील हॉटेल व्यावसायिक अस्लम अहेमद शेख म्हणाले, औरंगजेब कबर प्रकरणामुळे माझ्या हॉटेलची गेल्या १५ दिवसापासून धडाधड ऑनलाईन बुकींग रद्द होत आहे त्यामुळे मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.

पर्यटनासाठी यावे की नाही ?गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत पर्यटक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विचार करू लागले आहेत. जिल्ह्यातील वातावरण कसे आहे, पुढे परिस्थिती कशी राहील, पर्यटनासाठी यावे की, अन्य स्थळांकडे जावे, अशी विचारणा पर्यटकांकडून टूर व्यावसायिकांना होऊ लागली आहे. त्यामुळे सध्या वातावरण निवळले नाही तर पर्यटनाला फटका बसण्याची चिंता व्यक्त होत आहे. विशेषत: खुलताबाद, वेरुळ लेणी, देवगिरी किल्ला येथील स्थानिक रोजगार आणि उत्पन्नावर थेट परिणाम होण्याची भीती आहे.

टॅग्स :Aurangzeb Tombऔरंगजेबाची कबरchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरtourismपर्यटन