शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
2
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
5
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
6
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
7
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
8
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
9
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
10
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
11
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
12
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
13
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
14
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
15
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
16
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
17
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
18
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
19
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
20
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत

औरंगाबादेत रसिकांना भावणारे चित्रप्रदर्शन ‘काहीपण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 11:44 PM

मॉडर्न आर्ट, निसर्गचित्रे, फु ले यांच्यासोबत अंतरंगातल्या विविध भावभावना चित्रांच्या माध्यमातून दर्शवणारे चित्रप्रदर्शन रसिकांना मोहित करीत आहे. दि.१० फेब्रुवारी रोजी स. ११ वा. एमजीएम परिसरातील कला दीर्घा आर्ट गॅलरीमध्ये ‘अनटायटल्ड आणि काहीपण’ या दोनदिवसीय चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन झाले. यादरम्यान हरीश दहिहंडे आणि श्रुती दहिहंडे यांच्या आणि त्यांच्या विद्यार्थ्यांच्या कुुंचल्यातून साकारलेली चित्रे कलाप्रेमींना भावणारी ठरली.

ठळक मुद्दे१५ चित्रकारांच्या ३८ कलाकृती: मॉडर्न आर्ट, निसर्गचित्रे, फुलांसह अंतरंगातील विविध भावना

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मॉडर्न आर्ट, निसर्गचित्रे, फु ले यांच्यासोबत अंतरंगातल्या विविध भावभावना चित्रांच्या माध्यमातून दर्शवणारे चित्रप्रदर्शन रसिकांना मोहित करीत आहे. दि.१० फेब्रुवारी रोजी स. ११ वा. एमजीएम परिसरातील कला दीर्घा आर्ट गॅलरीमध्ये ‘अनटायटल्ड आणि काहीपण’ या दोनदिवसीय चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन झाले. यादरम्यान हरीश दहिहंडे आणि श्रुती दहिहंडे यांच्या आणि त्यांच्या विद्यार्थ्यांच्या कुुंचल्यातून साकारलेली चित्रे कलाप्रेमींना भावणारी ठरली.६ ते ४० वयोगटातल्या १५ कलावंतांची एकू ण ३८ चित्रे या चित्रप्रदर्शनात पाहायला मिळतात. यामध्ये प्रामुख्याने अ‍ॅक्रॅलिक, टेक्स्चर आणि कॅनव्हास यांचा वापर करण्यात आलेला आहे. प्रत्येक चित्र अतिशय बोलके असून, काहीना काही सुप्त संदेश देणारे आहे. हरीश आणि श्रुती यांच्या मार्गदर्शनाखाली आरव सांघानेरीया, अस्मिता जगदाळे, आस्था खंडेलवाल, देवांग दहिहंडे, इशानी कुलकर्णी, मल्हार मुळे, मंजिरी कुलकर्णी, मारिया नोमी, मुग्धा निकाळजे, नीना निकाळजे, पृथ्वीराज देवडा, राहुल सुल्ताने, सौरभ लताडे, शुभम कागलीवाल, तेजस्विनी खेडकर या कलावंतांनी रेखाटलेली चित्रे यादरम्यान पाहायला मिळतात.रविवार, दि. ११ रोजी स. ११ ते सायं. ८ यावेळेत हे चित्रप्रदर्शन सर्वांसाठी खुले असून, कलाप्रेमींनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.निसर्गचित्रांपासून ते व्यक्तिचित्रांपर्यंतचे सर्वच प्रकार या प्रदर्शनात पाहावयास मिळतात. यामधील टेक्स्चर पेंटिंग हा प्रकारही कलेचा उत्तम नमुना आहे. यामध्ये सुतळी, दोरी, कागद व कापड, असे विविध प्रकार वापरून तयार केलेली नक्षी अगोदर कॅन्व्हासवर चिकटवली जाते आणि नंतर तिच्यावर रंगकाम केले जाते. हा प्रकार अवघड असून, यासाठी जास्त वेळ लागत असल्याचे कलाकारांनी सांगितले. कलाकारांनी या प्रदर्शनासाठी मागील दोन-तीन महिन्यांपासून घेतलेली सातत्यपूर्ण मेहनत प्रत्येक चित्राच्या वेगळेपणातून दिसून येते.