शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादच्या उसाची काश्मीरपर्यंत गोडी; परराज्यातील ५०० रसवंतीला जिल्ह्यातून पुरवला जातो ऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 20:06 IST

फुलंब्री, सिल्लोड, खुलताबाद, गंगापूर तालुक्यांतील हजारावर शेतकरी या ऊस लागवडीकडे वळले आहेत.

ठळक मुद्दे हंगामात दररोज १०० ते १२५ टन ऊस राज्य-परराज्यातउसाच्या भावानुसार शेतकऱ्यांना दीड ते अडीच लाखांदरम्यान एकरी उत्पन्न

औरंगाबाद : केशर आंबा, मोसंबी, कापूस, मकासोबत आता उसासाठीही औरंगाबाद जिल्हा देशपातळीवर नावारूपाला येत आहे. येथील उसाच्या रसाची जम्मू- काश्मीरपर्यंतच्या लोकांना गोडी लागली आहे. हंगामात दररोज १०० टनांपेक्षा अधिक ऊस  राज्यासह परराज्यात पाठविला जातो. 

साखर कारखान्यापेक्षा टनामागे ३०० ते ६०० रुपयांपर्यंत जास्त भाव मिळत असल्याने शेतकरी आता रसवंतीलाच ऊस देत आहेत. फुलंब्री, सिल्लोड, खुलताबाद, गंगापूर तालुक्यांतील हजारावर शेतकरी या ऊस लागवडीकडे वळले आहेत. याचे श्रेय जाते ममुराबादचे (ता.खुलताबाद) रहिवासी राउफ पटेल यांना. पटेल हे व्यापारी. येथील उसाला जम्मू-काश्मीरपर्यंतची हक्काची बाजारपेठ मिळून देण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यांनी सांगितले  ८-१० वर्षांपूर्वी अत्यंत हलाखीची परिस्थिती होती. तेव्हा एका रसवंतीचालकाने विश्वास दाखवत ऊस पुरवठ्याचे काम दिले. गावातील शेतकऱ्यांकडून २० टन ऊस घेऊन तो रसवंतीगृहाला विकला.  तेव्हापासून मागे वळून पाहिले नाही. हंगामात दररोज १०० ते १२५ टन ऊस राज्य-परराज्यातील ५०० पेक्षा अधिक रसवंत्यांना आता मी पाठवितो. शेतकऱ्यांना ऊस शेतीकडे वळविण्यासाठी त्यांना बेनं उपलब्ध करून देणे,  ऊस आल्यावर त्याची तोडणी करणे व शेतकऱ्याला शेतातच पैसे उपलब्ध करून देऊ लागलो. उसाच्या भावानुसार शेतकऱ्यांना दीड ते अडीच लाखांदरम्यान एकरी उत्पन्न मिळत असल्याचे पटेल यांनी सांगितले. 

ऊस पुरवठ्याचा होलसेल व्यापार जानेवारी ते जूनदरम्यान महाराष्ट्र, इंदूर, भोपाळ, रायपूर येथील रसवंतीला ऊस पुरवठा केला जातो. जुलै व ऑगस्टदरम्यान राजस्थान, हरियाणा, दिल्ली, पंजाब व जम्मू-काश्मीर येथील रसवंतीसाठी ऊस पुरवला जातो. येथील ऊस कमी पडला तर नगर, नाशिक, पुणे जिल्ह्यातील ऊसही काश्मीरपर्यंत पाठविला जातो. पटेल यांच्याकडे काम केलेल्या चौघांनी आता स्वतःचा ऊस पुरवठ्याचा होलसेल व्यापार सुरू केला आहे.    

अनेकांना मिळाला रोजगार फुलंब्री, सिल्लोड, खुलताबाद, गंगापूर येथील हजार शेतकरी व ऊस तोडणी करणारे ५०० मजूर, हंगामात २० पेक्षा अधिक मालट्रक  व १००  पेक्षा अधिक टेम्पोचालक यांना रोजगार मिळाला आहे. जानेवारी ते ऑगस्ट या ८ महिन्यांत  ऊस तोडणी, वाहतूक व्यापाऱ्यांत १० कोटींपेक्षा अधिक उलाढाल होते. साखर कारखान्यापेक्षा टनामागे ४०० ते ५०० रुपये अधिक भाव मिळत असल्याने सुमारे १ हजार शेतकरी उसाकडे वळले आहेत.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीAurangabadऔरंगाबाद