शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

औरंगाबादमधील 'त्या' जलवाहिनीचे काम थर्ड पार्टी इन्स्पेक्शननंतर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 15:28 IST

पुंडलिकनगर जलकुंभ ते एन-५ पर्यंत ५०० मि.मी.ची जलवाहिनी टाकण्याचे काम महापौर नंदकुमार घोडेले यांनी थर्ड पार्टी इन्स्पेक्शन होईपर्यंत थांबविण्याचे आदेश  गुरुवारी दिले.

औरंगाबाद : पुंडलिकनगर जलकुंभ ते एन-५ पर्यंत ५०० मि.मी.ची जलवाहिनी टाकण्याचे काम महापौर नंदकुमार घोडेले यांनी थर्ड पार्टी इन्स्पेक्शन होईपर्यंत थांबविण्याचे आदेश  गुरुवारी दिले. ती जलवाहिनी टाकण्याची गरज, किती नागरिकांना पाण्याची अडचण आहे. सर्व बाबींची माहिती पाहणीनंतर समोर येईल. त्यानंतर जलवाहिनीचे काम करायाचे की नाही, याचा निर्णय होणार आहे. 

पुंडलिकनगर जलकुंभ पूर्ण क्षमतेने भरत नसताना त्या जलकुंभावर नवीन पाईपलाईन टाकण्यात येत असल्याने गेल्या महिन्यात ते काम बंद पाडण्यात आले होते. अभियंता चहल यांनी गुरुवारी पोलीस बंदोबस्तात ते काम सुरू करण्याचा प्रयत्न करताच नगरसेवक गजानन मनगटे, नगरसेविका मीना गायके, ज्योती मोरे यांनी घटनास्थळी धाव घेत घेराव घातला. एन-४ च्या भाजप नगरसेविका माधुरी अदवंत यादेखील तेथे आल्या. काम बंद करण्यावरून त्यांच्यात व सेना नगरसेवकांमध्ये वाद झाला. अभियंता गिरी यांना पाणीपुरवठा कुठून कसा करणार, ५०० मि.मी.ची जलवाहिनी दोन गल्ल्यांसाठी टाकतात का, याचा जाब सेना नगरसेवकांनी विचारला.  महापौर घोडेले यांनी घटनास्थळी धाव घेतली. रामदास गायके, वत्सला राऊत,  विशाल गायके, मंगल बडगुजर  शिवसेना कार्यकर्त्यांनी जलवाहिनीस विरोध केला. गजानननगरचे नगरसेवक आत्माराम पवार यावेळी गैरहजर होते.

नगरसेवकांची भूमिका जलवाहिनी टाकण्याच्या कामाचे अंदाजपत्रक तयार करू नये, तसेच नवीन कामही करू नये, असे आदेश मनपा आयुक्तांनी काढले आहेत. तरीही जलवाहिनी टाकण्याच्या कामाचा सपाटा सुरू आहे. पुंडलिकनगर जलकुंभ सद्य:स्थितीत पूर्ण क्षमतेने भरत नाही. १ लाख लोकांना पाणी देण्यासाठी तो जलकुंभ पूर्ण क्षमतेने भरण्याची जोपर्यंत व्यवस्था पालिका करीत नाही तोपर्यंत येथून नवीन जलवाहिनी टाकण्याच्या कामाला आमचा विरोध राहील, असे नगरसेवक मनगटे, गायके, मोरे यांनी सांगितले. नगरसेविका अदवंत म्हणाल्या की, एन-४ व  परिसराला पाण्याचा तुटवडा आहे, जलवाहिनीचे काम करावेच लागेल.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणीcidco aurangabadसिडको औरंगाबाद