शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

औरंगाबाद शहराचा कचरा फेकला खुलताबादेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 00:17 IST

औरंगाबाद महानगरपालिकेने शहरातील कचरा गुपचूप शनिवारी मध्यरात्री खुलताबाद येथील उरूस मैदान परिसरातील कब्रस्तान व म्हैसमाळ रोडलगत आणून टाकल्याने रात्रीच लोकांनी विरोध करून एक टिप्पर पकडून त्यास पोलिसांच्या ताब्यात दिले.

ठळक मुद्देमहापालिकेचा आगाऊपणा: खुलताबादकर संतप्त; वॉर्ड अधिकाऱ्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, टिप्पर जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कखुलताबाद : औरंगाबाद महानगरपालिकेने शहरातील कचरा गुपचूप शनिवारी मध्यरात्री खुलताबाद येथील उरूस मैदान परिसरातील कब्रस्तान व म्हैसमाळ रोडलगत आणून टाकल्याने रात्रीच लोकांनी विरोध करून एक टिप्पर पकडून त्यास पोलिसांच्या ताब्यात दिले. औरंगाबाद मनपाच्या या ‘आगाऊ’पणामुळे खुलताबादकर संतप्त झाले आहेत. दर्गाह कमिटीने दिलेल्या फिर्यादीवरून मनपा झोन क्र. ३ च्या वॉर्ड अधिकाºयांसह पाच जणांविरुद्ध खुलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून कचरा वाहतूक करणारे टिप्पर जप्त करण्यात आले.औरंगाबाद शहराचा कचरा प्रश्न गेल्या अनेक महिन्यांपासून गाजत असून, कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी महानगरपालिकेने आपला मोर्चा आता ग्रामीण भागाकडे वळविला आहे. खुलताबादेत शनिवारी मध्यरात्री तीन ते चार टिप्पर कचरा उरूस मैदान परिसरातील कब्रस्तानात आणून टाकला तर एक टिप्पर कचरा हा म्हैसमाळ घाटाखालील काला तलाव परिसरात आणून टाकला. दरम्यान, रात्री खुलताबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात बसलेल्या काही युवकांना टिप्पर जात असताना दुर्गंधी आली व ते कचºयाची विल्हेवाट लावत असल्याचे लक्षात आले. त्यांनी ही बाब गावकºयांसह पोलिसांनाही कळविली.यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू, पोलीस निरीक्षक हरीश खेडकर यांनी लगेच पोलिसांचे वाहन व काही युवकांना सोबत घेऊन म्हैसमाळ रस्ता गाठला. त्यावेळी तलावाजवळ कचरा टाकून लामणगावमार्गे टाकळी राजेरायकडे जात असलेले टिप्पर क्रमांक एमएच-२० बीटी ३२१ पकडले. खुलताबाद उरूस मैदान परिसरातील कब्रस्तान परिसरात कचरा टाकून दोन टिप्पर फरार झाले. यावेळी पोलिसांनी सर्वांना शांत करून हा प्रश्न रात्रीच मार्गी लावला नसता कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला असता.दरम्यान, सकाळी ही वार्ता शहरात पसरताच लोकांनी संतप्त होऊन कारवाई करण्याची मागणी केली. खुलताबाद येथील दर्गा कमिटीचे सचिव मोईनोद्दीन शरफोद्दीन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खालेद खान नवाज खान, रफिक रशीद शेख, सागर गणपत माने (तिघेही रा. हुसेनखाँ कॉलनी औरंगाबाद) वझोन क्रमांक ३ चे वॉर्ड अधिकारी मुकुंद कुलकर्णी, रमेश जाधव (खुलताबाद) यांच्याविरुद्ध कलम २६९, २७०, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी टिप्पर चालकासह इतरांना ताब्यात घेतले आहे. अधिक तपास बीट जमादार शेख शकील हे करीत आहेत.धार्मिकस्थळी कचरा टाकणे योग्य नाही४खुलताबाद शहर हे धार्मिक व पर्यटनस्थळ असून, दररोज हजारो पर्यटक व भाविक येथे भेट देत असतात. सध्या श्रावण महिना असून, वेरूळ, खुलताबाद, म्हैसमाळ येथे लाखो भाविकांची गर्दी होत असून, मनपाने टाकलेल्या कचºयामुळे मोठी दुर्गंधी सर्वत्र पसरली आहे. त्यामुळे भाविकांना नाक दाबून जावे लागत आहे. मनपाने पुन्हा कचरा टाकण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे गंभीर परिणाम दिसतील, असे खुलताबादचे माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. कैसरोद्दीन यांनी सांगितले.खबरदार कचरा टाकाल तर...४खुलताबाद येथील उरूस मैदान परिसरातील कब्रस्तान परिसरात कचरा टाकून मनपाने खुलताबादकरांच्या भावना दुखवल्या असून, यापुढे खुलताबाद परिसरात कचरा टाकाल तर खबरदार, असा इशारा दर्गा कमिटीचे अध्यक्ष तथा नगरसेवक मुनीबोद्दीन मुजीबोद्दीन यांनी दिला आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMuncipal Corporationनगर पालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्नKhulatabadखुल्ताबाद