शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

महामॅरेथॉनच्या फिटनेस पार्टीत औरंगाबादकरांचा दणक्यात ‘रॉकआॅन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 12:44 AM

किटी पार्टी, बर्थडे पार्टी आपण अनेकदा ऐकल्या आहेत. मात्र, अवघ्या महाराष्ट्रात पहिल्यांदाच झालेल्या ‘फिटनेस पार्टी’ला औरंगाबादकरांनी दणक्यात प्रतिसाद दिला आणि ‘वुई आर रेडी.....’ असे म्हणत १७ डिसेंबर रोजी शहरात होणाºया सॅफ्रॉन लॅण्डमार्क प्रस्तुत औरंगाबाद महामॅरेथॉनसाठी आपण जबरदस्त तयारीत असल्याचे दाखवून दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : किटी पार्टी, बर्थडे पार्टी आपण अनेकदा ऐकल्या आहेत. मात्र, अवघ्या महाराष्ट्रात पहिल्यांदाच झालेल्या ‘फिटनेस पार्टी’ला औरंगाबादकरांनी दणक्यात प्रतिसाद दिला आणि ‘वुई आर रेडी.....’ असे म्हणत १७ डिसेंबर रोजी शहरात होणाºया सॅफ्रॉन लॅण्डमार्क प्रस्तुत औरंगाबाद महामॅरेथॉनसाठी आपण जबरदस्त तयारीत असल्याचे दाखवून दिले.महामॅरेथॉनसाठी नावनोंदणी केलेल्या सर्व धावपटूंसाठी रविवारी सायंकाळी लोकमत लॉन येथे या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. महामॅरेथॉनचा महासोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असल्यामुळे आता धावपटूंनी फिटनेसबाबत अधिकाधिक जागरूक होणे आवश्यक झाले आहे. यासाठी सर्व धावपटूंनी एकत्र येऊन फिटनेससाठी ‘वार्म अप’ करावे आणि हेल्दी ड्रिंक आणि फूडचा आनंद घ्यावा, यासाठी रंगलेली ही पार्टी धावपटूंसाठी पर्वणीच ठरली.आकर्षक प्रकाशयोजना, थिरकण्यास भाग पाडेल असे ‘रॉकआॅन म्युझिक’ आणि हॉलिवूड तसेच बॉलिवूडच्या तालावर थिरकत आबालवृद्धांनी केलेला उत्स्फूर्त जल्लोष, असे उत्साहवर्धक वातावरण या पार्टीदरम्यान दिसून आले. सॅफ्रॉन लॅण्डमार्कचे अनिल मुनोत, ललित झांबड यांनी याठिकाणी येऊन उपस्थितांचा उत्साह वाढविला.महामॅरेथॉनसाठी शहरवासीयांमध्ये उसळलेल्या प्रचंड उत्साहाची प्रचीती या फिटनेस पार्टीत आली. व्यायामाचे जुने प्रकार मागे सोडून उपस्थितांनी रिलॅक्स झीलच्या एक्सपर्ट ट्रेनरनी शिकविलेले नवीन व्यायाम प्रकार आत्मसात केले आणि संगीताच्या तालावर स्वत:ला झोकून देत एकच जल्लोष केला. झुंबा, भांगडा, पिलोझिंग, मसाला बॉलिवूड यासारखे नवनवीन व्यायाम प्रकार आत्मसात करून उपस्थितांनी फिटनेस पार्टीचा ‘झिंगाट’ आनंद लुटला. आपल्या मित्रमंडळींसोबत आणि कुटुंबासोबत एकत्रितपणे व्यायाम करणे सर्वांसाठीच वेगळा अनुभव देणारे ठरले. यादरम्यान ज्येष्ठ नागरिकांनीही तरुणांच्या तालात ताल मिसळून झुंबाच्या तालावर ठेका धरून बहारदार नृत्य केले. व्यायाम करून नवचैतन्य मिळविल्यानंतर ‘हेल्दी’ पदार्थांचा आस्वाद घेऊन पार्टीचा समारोप झाला.