शहरं
Join us  
Trending Stories
1
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
2
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
3
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
4
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
5
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
6
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
7
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
8
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
9
'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?
10
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
11
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
12
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
13
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
14
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
15
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच
16
'या' अभिनेत्याला डेट करतीये राधिका मदन? रिलेशनशिपवर म्हणाला, "मी खूप चिपकू बॉयफ्रेंड..."
17
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...
18
RR vs PBKS : शशांक सिंहचा परफेक्ट फिनिशिंग टच! पंजाब किंग्जनं उभारली विक्रमी धावसंख्या
19
सोलापूर आग दुर्घटना; मृतांचा आकडा पोहचला आठवर; बेडरूममध्ये सापडले पाच जणांचे मृतदेह 
20
Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद

दर्जेदार, आशयघन कलाकृतींना औरंगाबादकरांचा उदंड प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 20:20 IST

विश्लेषण : दर्जेदार, आशयघन कार्यक्रम असतील तर रसिक, श्रोते हजेरी लावतात, हे औरंगाबादकरांनी दाखवून दिले.

- राम शिनगारे 

औरंगाबाद हे चळवळीचे शहर. सामाजिक, राजकीयसह इतरही घटनांची सुरुवात येथूनच होते. या शहरात विविध संस्था, संघटना व्याख्यान, चित्रप्रदर्शन, महोत्सव, आंदोलनाचे नियमितपणे आयोजन करीत असतात. या कार्यक्रमांना व्याख्याते, कलाकार, आयोजक तेच तेच असल्यामुळे रसिकांनी नेहमीच पाठ फिरविल्याचे दिसून येते. मात्र, शहरात नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल, विवेकानंद व्याख्यानमालेसह इतर कार्यक्रमांना औरंगाबादकरांनी दिलेला प्रतिसाद उदंड असाच होता. दर्जेदार, आशयघन, काहीतरी माहिती देणाऱ्या कलाकृतींचे रसग्रहण करण्यासाठी रसिक स्वत:हून जातात. हेच यातून दिसून आले.

चित्रपट, फिल्म फेस्टिव्हल, सांस्कृतिक कार्यक्रम म्हटले की पुणे, मुंबईचे नाव निघते. मात्र, औरंगाबादेत दर्जेदार कलाकृतींना आणून रसिकांना दाखविण्याचा विडाच काही युवकांनी घेतला होता. त्यास बुजुर्गांनी साथ दिली. यातूनच औरंगाबाद आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलची संकल्पना पुढे आली. यावर्षी फेस्टिव्हलचे सहावे वर्ष. ९ ते १३ जानेवारीदरम्यान पार पडला. यात कोल्ड वॉर, लव्हलेस, शॉप लिफ्टर्स, मंटो, आरोण, न्यूड, जोहार मायबाप, बंदीशाळा घटश्राद्ध, आम्रीत्यूम, आम्ही दोघी, अब्बू, सिन्सिअरली युवर्स ढाका यांच्यासह जगविख्यात दिग्दर्शक असलेले इंगमार बर्गमन यांनी दिग्दर्शित केलेले वाईल्ड स्ट्रॉबेरीज, सेव्हन्थ सिल, परसोना, आॅटम्न सोनाटा हे जागतिक दर्जाचे चित्रपट दाखविले. बर्गमन यांची जन्मशताब्दी असल्यामुळे स्वीडिश सरकारने त्यांचे चित्रपट उपलब्ध करून दिले. अशा दर्जेदार कलाकृती असलेल्या चित्रपटांना रसिकांनी गर्दी केली. चित्रपटासह कार्यक्रमांना येणाऱ्यांमध्ये ८० टक्के युवक होते.

चार दिवसांमध्ये तब्बल ५५०० पेक्षा अधिक जणांनी चित्रपट पाहिले. याशिवाय महोत्सवाच्या ठिकाणी गदिमा, पुल, सुधीर फडके, मन्ना डे, स्नेहल पाटकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त लावलेल्या पोस्टर प्रदर्शनालाही हजारोंच्या संख्येने रसिकांनी भेटी दिल्या. शहरात फेस्टिव्हल संस्कृती रुजविण्यासाठी आयोजक युवकांनी २० पेक्षा अधिक महाविद्यालयांत चित्रपट रसग्रहण कार्यशाळा घेतल्या. त्यासही युवकांनी उत्तम प्रतिसाद दिला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीनिमित्त ‘गांधी आणि सिनेमा’ या विषयावर अमरित गांगर यांच्या व्याख्यानालाही युवकांनी गर्दी केली होती. याच महोत्सवात शॉर्ट फिल्मसाठी दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांनी घेतलेला मास्टर क्लासही लक्षणीय ठरला. ज्येष्ठ उद्योजक नंदकिशोर कागलीवाल, एमजीएमचे विश्वस्त अंकुशराव कदम, अशोक राणे, प्रा. शिव कदम, नीलेश राऊत यांनी युवकांच्या सहकार्याने औरंगाबादकरांना दर्जेदार मेजवानी दिली.

विवेकानंद शिक्षण संस्थेतर्फे १४ ते १६ जानेवारीदरम्यान पहिल्यांदाच विवेकांनद जयंतीनिमित्त ‘विवेकानंद व्याख्यानमाला’ सुरू केली. यात मॅगसेस पुरस्कार विजेते पी. साईनाथ यांनी ‘शेतकऱ्यांच्या समस्या आणि आत्महत्या’ या विषयावर व्याख्यान दिले. शेतकरी हा विषय आला की नेहमीचेच रडगाणे, असा काहीसा दृष्टिकोन बनलेल्या वातावरणात त्यांच्या व्याख्यानाला मिळालेला प्रतिसाद निश्चित विचारी मनाला दिलासादायक होता. यानंतर दुसरे व्याख्यान आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांचे झाले. यात व्याख्यानाला पहिल्या दिवशीच्या व्याख्यानापेक्षा अधिक गर्दी होती. यात युवकांची संख्या लक्षणीय होती, हे विशेष.

हवामान बदल हा विषय समजून घेण्याची युवकांची उत्सुकता वाखाणण्याजोगी होती. जम्मू-काश्मिरात अतिरेक्यांनी उद्ध्वस्त केलेल्या कुटुंबातील मुलींसाठी झगडणाऱ्या अधिक कदम यांच्या व्याख्यानमालेतील शेवटच्या व्याख्यानाला शहरातील युवकांनी अभूतपूर्व असा प्रतिसाद दिला. श्रोत्यांना बसण्यासाठी खुर्च्या अपुऱ्या पडल्या. हा संकेत आनंददायी आहे, हे निश्चित. काही दिवसांपूर्वी बशर नवाज यांच्या स्मरणार्थ ‘बज्म-ए-बशर’ हा व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप आणि आम्ही परभणीकर सांस्कृतिक मंचतर्फे दत्तप्रसाद रानडे यांच्या गजल मैफल आयोजित केली होती. त्या कार्यक्रमालाही सभागृहात बसण्यास जागा शिल्लक राहिली नव्हती. यावरून दर्जेदार, आशयघन कार्यक्रम असतील तर रसिक, श्रोते हजेरी लावतात, हे औरंगाबादकरांनी दाखवून दिले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcultureसांस्कृतिकSocialसामाजिक