शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

औरंगाबादकरांनो पुढे या ! कोरोना लसची महिनाभर चिंता मिटली; मुबलक साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 17:54 IST

Corona vaccine in Aurangabad : १६ जानेवारी २०२१ ते ऑगस्ट या सात महिन्यात शहर व ग्रामीण भागात पहिला डोस घेणाऱ्यांची टक्केवारी ३०.१९ एवढी आहे.

ठळक मुद्दे‘सीएसआर’मध्ये १ लाख १५ हजार लसचा मिळणार साठातसेच शासनाकडून दर आठवड्याला २० ते २५ हजार डोस मिळणार आहेत.

औरंगाबाद : कोरोना प्रतिबंधक लस ( Corona vaccine ) घेण्यासाठी शहरात सर्वसामान्य नागरिक आरोग्य केंद्रांवर गर्दी करीत आहेत. मात्र, शासनाकडून मुबलक प्रमाणात साठा मिळत नसल्याने नागरिकांना पहिल्या, दुसऱ्या डोससाठी प्रतीक्षा करावी लागत होती. आता पुढील महिनाभर तरी जिल्ह्याला लसची टंचाई जाणवणार नाही. बजाज कंपनी काॅर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) अंतर्गत २ लाख ३० हजार डोस उपलब्ध करून देत आहे. या शिवाय शासनाकडून दर आठवड्याला २० ते २५ हजार डोस मिळणार आहेत. ( Corona vaccine relieved anxiety for a month; Abundant stocks available in Aurangabad ) 

१६ जानेवारी २०२१ ते ऑगस्ट या सात महिन्यात शहर व ग्रामीण भागात पहिला डोस घेणाऱ्यांची टक्केवारी ३०.१९ एवढी आहे. दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांचा टक्का १०.९४ एवढा आहे. जिल्ह्यात लसीकरणाचे उद्दिष्ट ३२ लाख ८७ हजार ८४ एवढे निश्चित झाले आहे. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ७० टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण होणे अपेक्षित आहे. मात्र, शासनाकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळायला तयार नाही. आठवड्यातून चार ते पाच दिवस लस नसल्याने आरोग्य यंत्रणेला मोहीम बंद ठेवावी लागते. बजाज समूहाने सीएआरमधून शहराला १ लाख १५ हजार तर ग्रामीणलाही १ लाख १५ हजार डोस देण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी हा साठा प्राप्त होण्याची शक्यता महापालिकेच्या आरोग्य विभागाने वर्तविली आहे.

'प्रोजेक्टसह भेटा, फक्त चर्चा नको'; आता सरकारचे फक्त ९३५ दिवसच शिल्लक

शहरात ६.७६ लाख लसीकरणशहरात महापालिकेने लसीकरणाचे उद्दिष्ट ११ लाख ७६ हजार ९९९ एवढे आहे. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात लसीकरणाची टक्केवारी अधिक आहे. शहरात ६ लाख ७६ हजार ४४ नागरिकांचे लसीकरण झाले. दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ही केवळ १ लाख ९९ हजार ९९७ एवढी आहे. दुसरा डोसचे हे प्रमाण निश्चित टार्गेेटच्या केवळ १६.९९ टक्के एवढे आहे.

ग्रामीणमध्ये ७.५६ टक्के लसीकरणग्रामीण भागात एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात लसीकरणाचे उद्दिष्ट २१ लाख १० हजार ८१५ एवढे आहे. ग्रामीणमध्ये २४.४४ टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतला. दुसऱ्या डोसचे प्रमाण केवळ ७.५६ टक्के आहे. ग्रामीणमध्ये १ लाख ५९ हजार ६८१ नागरिकांचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागात लसीकरणाची टक्केवारी वाढवण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

आतापर्यंतचे लसीकरणभाग- निश्चित उद्दिष्ट- पहिला डोस - दुसरा डोसग्रामीण २१,१०,८१५ - ५,१५,८०३ - १,५९,६८१शहर ११,७६,९९ - ४,७६,०४७ - १,९९,९९७एकूण ३२,८७,८१४ - ९,९१,८५० - ३,५९,६७८टक्केवारी १०० टक्के - ३०.१७ टक्के - १०.९४ टक्के.

बापरे ! महापालिकेत वर्षभरात काढल्या जातात १२ लाख संगणक प्रिंट

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका