शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादच्या महिलांचा पाण्यासाठी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 00:41 IST

मनपाने दोन दिवसाआड पाणी द्यावे, किमान १ तास तरी पाणी द्यावे आदी मागण्यांसाठी सुरेवाडीतील संतप्त महिलांनी चक्क सिडको एन-७ येथील पाण्याच्या टाकीवर हल्लाबोल केला. आठ दिवसांत पाणी प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिल्यावर महिलांनी आंदोलन मागे घेतले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मनपाने दोन दिवसाआड पाणी द्यावे, किमान १ तास तरी पाणी द्यावे आदी मागण्यांसाठी सुरेवाडीतील संतप्त महिलांनी चक्क सिडको एन-७ येथील पाण्याच्या टाकीवर हल्लाबोल केला. आठ दिवसांत पाणी प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिल्यावर महिलांनीआंदोलन मागे घेतले.मंगळवारी सकाळी सुरेवाडी भागातील १०० हून अधिक महिला, नगरसेवक सीताराम सुरे यांच्यासह पाण्याच्या टाकीवर धडकल्या. रिकामे हंडे घेऊन आलेल्या महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर त्यांनी सिडको एन-७ येथील पाण्याच्या टाकीवरून जवळच असलेल्या एन-७ येथील पाणीपुरवठा कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. सुरेवाडी भागात अल्पदाबाने फक्त ४५ मिनिटेच पाणी येते. त्यामुळे अनेक घरांना पाणीच मिळत नाही. पाण्याची वेळ एक तास करण्यात यावी. पूर्वीप्रमाणे दोन दिवसाआड पाणी द्यावे, अशा मागण्यांचे निवेदन महापौरांना देण्यात आले. महापौरांनी सिडको एन-७ आणि एन-५ येथील पाणी वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. आठ दिवसांत पाणीप्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.यावेळी सेनेचे शहराध्यक्ष बाळू थोरात, विभागप्रमुख गणेश सुरे, शाखाप्रमुख रमेश सूर्यवंशी, संजय नवले, अपर्णा रामावत, सुदर्शन पवार, सुरेखा निर्मळ, पुष्पा चव्हाण, भागूबाई विघाटे, नम्रता पवार, कुसुम मिसाळ, कविता कोलते, कांताबाई राजपूत आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :agitationआंदोलनAurangabadऔरंगाबादWomenमहिला