शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

धम्म चळवळीला औरंगाबाद गती देईल, जागतिक परिषदेचा समारोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 07:31 IST

जग बौद्ध धम्माकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहे. अशा वेळी औरंगाबादनजीक आंतरराष्ट्रीय लोकुत्तरा धम्म प्रशिक्षण केंद्र उभे राहिले.

औरंगाबाद : जग बौद्ध धम्माकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहे. अशा वेळी औरंगाबादनजीक आंतरराष्ट्रीय लोकुत्तरा धम्म प्रशिक्षण केंद्र उभे राहिले. या केंद्रातून आता पुरेसे प्रशिक्षित भिक्खू उपलब्ध होतील. यामुळे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील धम्म चळवळीला गती मिळेल, असा विश्वास विविध देशांतून आलेल्या भिक्खूंनी व्यक्त केला. जगभरातील बौद्ध राष्ट्र या केंद्रासाठी आवश्यक ते सहकार्य करतील, असा शद्बही त्यांनी दिला.नागसेनवन परिसरात आयोजित तीनदिवसीय जागतिक धम्म परिषदेचा समारोप रविवारी रात्री भिक्खू संघाच्या उपस्थितीत झाला. कार्यक्रमाला सुमारे बारा देशांसह राज्याच्या विविध भागांतील भिक्खूंची उपस्थिती होती. भदन्त संघसेना यांनी परिषदेच्या संयोजकांचे कौतुक केले. श्रीलंका, थायलंड आदी देशांच्या तुलनेत येथे साधनांची कमतरता आहे. मात्र, त्यावरही मात करीत ही परिषद ऐतिहासिक ठरल्याचे ते म्हणाले. भदन्त सदानंद महास्थवीर म्हणाले की, मागील तीन दिवसांत बौद्ध तत्त्वज्ञानाबरोबरच अनेक गंभीर आणि महत्त्वाच्या विषयावर येथे चर्चा झाली. चर्चेचे केवळ श्रवण न करता या परिषदेने दिलेले विचार आत्मसात करा.डॉ. सुमेधो यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा गौरव केला. त्यांच्यामुळेच या देशातील वंचितांना माणुसकीचे हक्क मिळाल्याचे सांगून बाबासाहेबांनी दिलेला शिक्षणाचा मंत्र आपण अंगीकारला. आज त्याचे दृश्य परिणाम दिसत आहेत. भारतातील सर्वाधिक साक्षर समाज बौद्ध असून, इतर क्षेत्रातही तो आघाडीवर आहे. बुद्ध धम्माला आणखी गती मिळाल्यास या देशाला पुन्हा सोन्याचे दिवस येतील, असे ते म्हणाले.श्रीलंकेचे जीनरत्न महास्थवीर यांनी जगाला ‘युद्ध नको, बुद्ध हवा’ असल्याचे सांगितले. भारताचे कधीकाळी जम्बोदीप असे नाव होते. अशोकाच्याकाळात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत हा देश बुद्धमय होता. त्यामुळेच भारतातच नव्हे तर जगात कुठेही इतिहास खोदाल तर तेथे बुद्धच आढळून येईल, असे म्हणाले.भन्ते मेनेरिका यांनी मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी सोहळ्यानंतरचा भव्यदिव्य कार्यक्रम म्हणून या धम्म परिषदेची नोंद होईल. आपण परिषदेसाठी श्रम, वेळ, पैसा दिला. यावेळी डॉ. देवेंद्र (म्यानमार), डॉ. प्रमाहा केराती (थायलंड), डॉ. लि (कोरिया), डॉ. धम्मकीर्ती (अरुणाचल प्रदेश) डॉ. सुमेधो यांनीही मार्गदर्शन केले. समारोप कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने बौद्ध अनुयायांची उपस्थिती होती.कांबळे दाम्पत्याचा विशेष गौरवअतिशय नेटके नियोजन करीत, कमी वेळेत सर्वांना सोबत घेऊन मुख्य संयोजक हर्षदीप कांबळे आणि त्यांच्या पत्नी रोजाना व्हॅनिच यांनी औरंगाबादेतील ही धम्म परिषद यशस्वी करून दाखविली. धम्म चळवळ गतिमान करण्यासाठी कांबळे दाम्पत्य घेत असलेले परिश्रम मोलाचे आणि प्रेरणादायी असल्याचे सांगत, भिक्खू संघाच्या वतीने धम्मवस्त्र देऊन त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. या तीनदिवसीय जागतिक धम्म परिषदेच्या एकाही फलकावर कांबळे यांचे छायाचित्र नव्हते. धम्म आणि चळवळीविषयीची त्यांचीतळमळ आणि प्रामाणिकपणाच यावरून दिसून येतो, असेही भदन्त संघसेना म्हणाले.

टॅग्स :Dalai Lamaदलाई लामाAurangabadऔरंगाबाद