शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये प्रक्रियेच्या आडून कचरा पुरणे सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 00:08 IST

जुन्या शहरात साचलेला कचरा उचलून जिथे जागा मिळेल तेथे नेऊन पुरण्याचे प्रमाण मागील आठ दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढले आहे. स्थानिक नागरिकांनी कडाडून विरोध केल्यास मनपा अधिकारी व शासन नियुक्त अधिकारी चक्क नागरिकांना सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करण्याची धमकी देत आहेत. कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्यास नागरिकांना विरोध नाही, पण प्रक्रिया करण्याच्या नावाखाली खड्डे करून अक्षरश: कचरा पुरण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जुन्या शहरात साचलेला कचरा उचलून जिथे जागा मिळेल तेथे नेऊन पुरण्याचे प्रमाण मागील आठ दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढले आहे. स्थानिक नागरिकांनी कडाडून विरोध केल्यास मनपा अधिकारी व शासन नियुक्त अधिकारी चक्क नागरिकांना सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करण्याची धमकी देत आहेत. कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्यास नागरिकांना विरोध नाही, पण प्रक्रिया करण्याच्या नावाखाली खड्डे करून अक्षरश: कचरा पुरण्यात येत आहे.मागील ३८ दिवसांपासून शहरात कचºयाची समस्या निर्माण झाली आहे. १३०० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प तयार करणाºया, ‘क’प्रवर्गातील महापालिकेला हा प्रश्न अद्याप सोडविता आलेला नाही. शासनाने विशेष बाब म्हणून या प्रश्नात लक्ष घातले. राज्याच्या वेगवेगळ्या भागातील नऊपेक्षा अधिक अधिकारी कचरा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेला देण्यात आले. त्यानंतरही प्रश्न जशास तसा आहे. ज्या ठिकाणी कचºयाचे मोठ-मोठे डोंगर साचले आहेत, तेथे केमिकल फवारणी करण्यात येत आहे. जिथे कचरा कमी आहे, तेथील कचरा उचलून शासकीय, निमशासकीय जागेवर नेऊन पुरण्यात येत आहे. ओला व सुका कचरा एकत्र, त्यात कॅरिबॅग, प्लास्टिक, लोखंड आदी सर्वच साहित्य आहे. रविवारी कडा आॅफिस शेजारी खड्डा करून अक्षरश: कचरा पुरण्याचे काम सुरू होते. परिसरातील नागरिकांनी या अशास्त्रोक्त पद्धतीला विरोध दर्शविला. मनपा आणि शासकीय अधिकाºयांनी चक्क नागरिकांवर गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली. महापालिकेच्या या प्रवृत्तीमुळे नागरिकांमध्ये असंतोष अधिक वाढू लागला आहे.अजून एकदाही आंदोलन नाहीकचरा प्रश्नावर अद्याप औरंगाबादकर मौन बाळगून आहेत. नागरिकांनी अजून लोकशाही मार्ग अवलंबला नाही. आज नाही तर उद्या हा प्रश्न मिटेल, अशी आशा बाळगून नागरिक आहेत. मागील एक महिन्यापासून मनपा प्रशासन कचºयावर प्रक्रिया करणारी यंत्रणा खरेदी करण्याची निव्वळ घोषणा करीत आहे. अंमलबजावणी मात्र शून्य आहे. लवकरच हा प्रश्न मार्गी न लागल्यास नागरिक रस्त्यावर हे निश्चित.वर्गीकरणास नगरसेवकांचा पाठिंबा नाहीजुन्या शहरातील मनपाचे झोन १,२ आणि ३ मध्ये परिस्थिती अत्यंत विदारक आहे. येथील नगरसेवक ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी मनपाला अजिबात सहकार्य करीत नसल्याचेही प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. नगरसेवकांनी मनावर घेतले तर आठ दिवसांत जुन्या शहरातही शंभर टक्के कचºयाचे वर्गीकरण सहज शक्य आहे.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादNaregaon Garbage Depoनारेगाव कचरा डेपो