शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

औरंगाबादच्या प्रतीक्षाची ‘खेलो इंडिया’साठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 12:53 AM

नवी दिल्ली येथे ‘खेलो इंडिया’अंतर्गत होणाºया अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेसाठी औरंगाबाद येथील क्रीडा प्रबोधिनीची राष्ट्रीय धावपटू प्रतीक्षा सणस हिची निवड झाली आहे. त्याचप्रमाणे क्रीडा प्रबोधिनीत अनेक राष्ट्रीय खेळाडू घडविणाºया औरंगाबाद येथील पूनम नवगिरे यांची प्रशिक्षिका म्हणून निवड झाली आहे. महाराष्ट्र संघाचे शिबीर सध्या पुणे येथे सुरु आहे.

औरंगाबाद : नवी दिल्ली येथे ‘खेलो इंडिया’अंतर्गत होणाºया अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेसाठी औरंगाबाद येथील क्रीडा प्रबोधिनीची राष्ट्रीय धावपटू प्रतीक्षा सणस हिची निवड झाली आहे. त्याचप्रमाणे क्रीडा प्रबोधिनीत अनेक राष्ट्रीय खेळाडू घडविणाºया औरंगाबाद येथील पूनम नवगिरे यांची प्रशिक्षिका म्हणून निवड झाली आहे. महाराष्ट्र संघाचे शिबीर सध्या पुणे येथे सुरु आहे.प्रतीक्षा सणस ही गेल्या काही वर्षांपासून जबरदस्त कामगिरी करीत आहे. तिने २0१४ साली विशखापट्टणम येथे राष्ट्रीय स्पर्धेत लांब उडीत रौप्यपदक जिंकले होते. तसेच २0१५ मध्ये रांची येथील राष्ट्रीय स्पर्धेत १४ वर्षांखालील ट्रायथलॉनमध्ये गोल्डन कामगिरी केली होती. २0१६ मध्येही तिने वडोदरा येथील राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. केरळ येथील राष्ट्रीय स्पर्धेत तिने महाराष्ट्राला ४ बाय १00 रिलेत सुवर्णपदक जिंकून देण्यात निर्णायक योगदान दिले होते. तिच्या या कामगिरीची दखल भारताची प्रख्यात धावपटू पी. टी. उषा हिनेदेखील घेताना तिची विशेष प्रशंसा केली होती. गतवर्षी तिने भोपाळ येथील राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राला रिलेत कास्यपदक जिंकून देण्यात योगदान दिले होते. खेलो इंडियाअंतर्गत अ‍ॅथलेटिक्समध्ये प्रतीक्षा सणस ही ४ बाय १00 मीटर रिलेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. प्रतीक्षा सणस हिला पूनम नवगिरे आणि सुरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन लाभले आहे.