शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये पालेभाज्यांचे भाव मातीमोल; अतिरिक्त उत्पादनाचा शेतकर्‍यांना फटका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 16:57 IST

‘मेथीची गड्डी घ्या, पालकाची गड्डी घ्या, कांद्याची पात घ्या, १ रुपया गड्डी, असे ओरडून शेतकरी, विक्रेते जाधववाडीत बुधवारी पालेभाज्या विकत होते. मातीमोल भावात विकून शिल्लक राहिलेल्या भाज्यांवर नंतर म्हशी, गायींनी मनसोक्त ताव मारला. एवढेच नव्हे तर नाशिकहून आलेली पत्ताकोबी, फुलकोबी, टोमॅटोचे दर एवढे खाली आले की, २ ते ५ रुपये प्रतिकिलोने विकावे लागले. तर दुपारनंतर अडत दुकानात फळभाज्यांचे ढीगच्या ढीग पडले होते.  

औरंगाबाद : ‘मेथीची गड्डी घ्या, पालकाची गड्डी घ्या, कांद्याची पात घ्या, १ रुपया गड्डी, असे ओरडून शेतकरी, विक्रेते जाधववाडीत बुधवारी पालेभाज्या विकत होते. मातीमोल भावात विकून शिल्लक राहिलेल्या भाज्यांवर नंतर म्हशी, गायींनी मनसोक्त ताव मारला. एवढेच नव्हे तर नाशिकहून आलेली पत्ताकोबी, फुलकोबी, टोमॅटोचे दर एवढे खाली आले की, २ ते ५ रुपये प्रतिकिलोने विकावे लागले. तर दुपारनंतर अडत दुकानात फळभाज्यांचे ढीगच्या ढीग पडले होते.  

पोषक वातावरणामुळे पालेभाज्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. यामुळे मातीमोल भावात पालेभाज्या विकाव्या लागत आहेत. जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अडत बाजारात आज सर्व पालेभाज्या व फळभाज्या दुपारनंतर शिल्लक राहिल्या होत्या. १० रुपयांना १० मेथीच्या गड्ड्या, त्याच भावात पालक व कांद्याची पात विकल्या जात होती.  दुपारी १२ वाजेनंतर तर शेतकर्‍यांनी शिल्लक मेथी, पालक जागेवरच टाकून घरचा रस्ता धरला. तर विक्रेते ओरडून ओरडून ग्राहकांना आपल्याकडील पालेभाज्या विकत होते. शेतकर्‍यांनी फेकून दिलेल्या शेकडो गड्ड्या मेथी, पालकाच्या गड्ड्यांवर नंतर म्हशी व गायींनी मनसोक्त ताव मारला.

नाशिकहून सुमारे १५ टन पत्ताकोबी व  २० टन फुलकोबी  बाजारात आली होती. मागणी कमी आवक जास्त झाल्याने पत्ताकोबी २ ते ३ रुपये तर फुलकोबी ४ ते ५ रुपये किलोने विकल्या जात होती. तरीही अनेक क्विंटल माल विक्रीविना अडत्यांच्या दुकानातच पडून होता. टोमॅटोचे कॅरेटच्या कॅरेट दुकानासमोर ठेवण्यात आले होते. ४ ते ५ रुपये किलो भावाने टोमॅटो विकल्या जात नव्हते. वांगे १५ किलोचे कॅरेट १०० रुपयाला मिळत होते. अशी दैन्यावस्था अडत बाजारात बघावयास मिळाली. 

शेतकर्‍याचा खिसा रिकामाच मांडकी येथून माझ्या व अन्य शेतकर्‍यांच्या शेतातील मेथी व पालक जाधववाडीत विक्रीला आणला होता. पण येथे १० रुपयाला १० गड्ड्या विकाव्या लागल्या. तरीही माझ्याकडे २०० गड्ड्या शिल्लक राहिल्या. अखेर भाज्या फेकून द्याव्या लागल्या. भाज्यांची काढणी व वाहतूक खर्चही निघाला नाही. -सुभाष डाक, शेतकरी, मांडकी

८० टन बटाटे बाजारात इंदोर व गुजरात येथून ७० ते ८० टन बटाटे जाधववाडीत विक्रीला आले. इंदोरचा बटाटा ८ ते १० रुपये किलो तर गुजरातचा बटाटा ५ ते ७ रुपये किलोने विक्री करण्यात आला. इंदोरचा बटाटा वेफर्ससाठी उपयोगात येत असल्याने वेफर्स उद्योगांनी बटाटा खरेदी केला. तरी पण अनेक क्विंटल माल विक्रीविना पडून राहिला. -मुजीब शेठ जम्मू शेठ, अडत व्यापारी

लसूणही १० ते २० रुपये किलो नवीन लसणाची आवक सुरू झाल्याने जुन्या लसणाचे भाव गडगडले. मध्यप्रदेशातून जाधववाडीत मोठ्या प्रमाणात जुन्या हायब्रीड लसणाची आवक झाली. आज १ हजार ते २ हजार रुपये प्रतिक्विंटलने लसूण विक्री झाला. १० ते २० रुपये किलोने लसूण मिळत होता. -इलियास बागवान, अडत व्यापारी

टॅग्स :Farmerशेतकरीvegetableभाज्याAurangabadऔरंगाबाद