शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत नोटा बदली प्रकरणाची चौकशी पूर्ण; मात्र दोषींना आरोपपत्र देण्यास टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 16:21 IST

एसटी महामंडळातील नोटा बदली प्रकरणात सुरक्षा व दक्षता अधिकार्‍यांकडून चौकशी केल्यानंतर अखेर काही अधिकारी, कर्मचारी दोषी आढळले आहेत; परंतु पंधरा दिवस उलटून अद्यापही दोषींना आरोपपत्र देण्यात आलेले नाही.

औरंगाबाद : एसटी महामंडळातील नोटा बदली प्रकरणात सुरक्षा व दक्षता अधिकार्‍यांकडून चौकशी केल्यानंतर अखेर काही अधिकारी, कर्मचारी दोषी आढळले आहेत; परंतु पंधरा दिवस उलटून अद्यापही दोषींना आरोपपत्र देण्यात आलेले नाही. दोषींना अभय देण्यासाठीच आरोपपत्र देण्यास टाळाटाळ होत असल्याची ओरड होत आहे.

एसटी महामंडळातील जुन्या पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा बदली प्रकारावर गेल्या वर्षभरात पडदा पडला होता; परंतु काही दिवसांपूर्वीच याप्रकरणी एसटी महामंडळाच्या सुरक्षा व दक्षता अधिकार्‍यांकडून चौकशी करण्यात आली. तेव्हा यामध्ये काही जण दोषी असल्याचा अहवाल नुकताच विभाग नियंत्रकांना देण्यात आला आहे. त्यामुळे वर्षभरानंतर किमान आता तरी नोटा बदलीप्रकरणी दोषींवर कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. हा अहवाल प्राप्त होऊन १५ दिवसांपेक्षा अधिक कालावधी उलटला आहे. चौकशी अहवाल प्राप्त झाल्याने त्यावरून आरोपपत्र दिले जाणार असल्याचे अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले; परंतु अद्यापही आरोपपत्र देण्यात आलेले नाही. या प्रकरणामध्ये अडकू नये, यासाठी वरिष्ठ पातळीवर संपर्क  करून काही जण प्रयत्न करीत आहेत. त्यामुळेच इतर कामकाजाचे कारण पुढे करून आरोपपत्र देण्यास विलंब केला जात आहे, असा आरोप होत आहे.

अधिकारी म्हणतात...सध्या यात्रेमुळे प्रवाशांच्या गर्दीचे नियोजन केले जात आहे. लवकरच आरोपपत्र दिले जातील, असे एसटी महामंडळाचे विभागीय वाहतूक अधीक्षक यू. जे. पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :MONEYपैसाAurangabadऔरंगाबाद