शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
4
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
5
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
6
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
7
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
8
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
9
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
10
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
11
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
12
Mumbai: केतकीपाडा, फिल्मसिटी, दामूनगर येथील झोपड्यांवरील कारवाईला आठ दिवसांची मुदतवाढ
13
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
14
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
15
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
16
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा ६ विषयांत झाला फेल तरी पालकांनी कापला केक, कारण...
17
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
18
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
19
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
20
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."

औरंगाबादमधील आगारात एसटी कर्मचाऱ्यांची 'दंगल'; सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2020 19:47 IST

गंभीर जखमी झालेल्या सुरक्षा रक्षकावर जळगावात उपचार सुरू

सोयगाव (औरंगाबाद):  सोयगाव आगारात एसटी कर्मचाऱ्यांनीच लाठ्याकाठ्यानी आगाराच्या प्रवेशद्वारात कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी पहाटे घडली. याप्रकरणी सुरक्षा रक्षकांच्या फिर्यादीवरून पाच एसटी कर्मचाऱ्यांवर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोयगाव आगारातील या कर्मचाऱ्यांच्या दंगलीत सुरक्षा रक्षक राणीदास सांडू चव्हाण (वय ३७) हे गंभीर जखमी झाले असून तातडीने उपचारासाठी त्यांना जळगावला रवाना करण्यात आले आहे

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोयगाव आगारच्या प्रवेशद्वारातील सुरक्षा रक्षक राणीदास चव्हाण हे कर्तव्यावर असताना तीन वाहक (प्रभू चोपडे, परमेश्वर शिंगाडे, विजय श्रीरामे) व दोन चालक (राजू बारी, राजेंद्र भोपे) या पाच जणांनी पहाटे सात वाजताच आगाराकडे येत असताना स्थानक प्रमुख कैलास बागुल यांनी सुरक्षा रक्षक राणीदास चव्हाण यांना सूचना देऊन या पाच जणांना आगारात प्रवेश देऊ नको अशा सूचना देताच सुरक्षा रक्षक राणीदास चव्हाण यांनी या पाच जणांना प्रवेशद्वारात रोखले असता या पाचही जणांनी त्याचेवर प्राणघातक हल्ला चढवून चालक रघुनाथ बारी यांनी त्याचे हातातील काठी हिसकावून पाचही जणांनी लाठ्याकाठ्यांनी सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. या घटनेमुळे आगार परिसरात तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी राणीदास चव्हाण यांच्या फिर्यादीवरून तीन वाहक आणि दोन चालक यांचे विरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे 

तातडीने निलंबनाचे आदेशया प्रकरणी सोयगाव आगार प्रमुख हिरालाल ठाकरे यांनी तातडीने या दंगल प्रकरणाची माहिती जिल्हा वाहतूक नियंत्रक यांना पाठविली असता दुपार पर्यंत या पाचही जणांचे निलंबनाचे आदेश प्राप्त झाल्यावरून आगार प्रमुख ठाकरे यांनी वरिष्ठांच्या आदेशावरून त्या पाचही जणांना निलंबित करण्याची कारवाई केली आहे.दंगलीचे पडसाद वाहतुकीवरसोयगाव आगारात दंगलीची बातमी स्थानकावर पसरताच सोयगाव बस स्थानकात सन्नाटा पसरला होता त्यामुळे एस टी च्या वाहतुकीवर पडसाद उमटले होते. याप्रकरणी प्रभारी पोलीस निरीक्षक किरण आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गीते,जमादार संतोष पाईकराव, सुभाष पाटील,रवींद्र तायडे, सागर गायकवाड आदी करत आहे