शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये प्राध्यापकाचे बंद घर फोडून सहा लाखाचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 17:30 IST

रेल्वेस्टेशन परिसरातील बन्सीलालनगर येथील द्वारकापुरीमधील बंद बंगल्याच्या खिडकीचे गज कापून चोरट्यांनी धाडसी घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली आहे.

औरंगाबाद : रेल्वेस्टेशन परिसरातील बन्सीलालनगर येथील द्वारकापुरीमधील बंद बंगल्याच्या खिडकीचे गज कापून चोरट्यांनी धाडसी घरफोडी केल्याची घटना सोमवारी (दि.११ ) उघडकीस आली आहे. चोरीत सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे साडेपाच ते सहा लाखाचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. या प्रकरणी वेदांतनगर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

प्राप्त माहिती अशी की,बन्सीलालनगरमधील द्वारकापुरी कॉलनीमध्ये राहणारे प्रा. राहुल प्रदीप अग्रवाल हे एमआयटी कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे. तर त्यांच्या वडिलांचा व्यवसाय आहे. दिल्ली येथे नातेवाईकांच्या विवाह समारंभासाठी अग्रवाल कुटुब मागील सहपरिवार तिकडे गेले होते. रविवारी (दि.११) दुपारी ३ वाजेच्या सुमारास घरी परतले असता त्यांना चोरट्यांनी घराची खिडकीची गज कापून चोरी केल्याचे समजले. या घटनेची माहिती त्यांनी वेदांतनगर पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अनिल आढे, गुन्हेशाखेचे निरीक्षक शिवाजी कांबळे हे त्यांच्या दोन पथकांसह तेथे दाखल झाले. 

चोरट्यांनी खिडकीचे लोखंडी गज कापून घरात प्रवेश केला व बेडरूममधील आलमारीचे कुलूप तोडले. त्यात असलेली १४ तोळ्याचे सोन्याचे दागिने, सव्वा किलोची चांदीची भांडी व रोख १ लाख २५ हजार असा सुमारे साडेपाच ते सहा लाखाचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी वेदांतनगर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.