शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Aurangabad Shivsena: शिवसेनेतला अंतर्गत वाद चव्हाट्यावर, औरंगाबादमध्ये सेनेच्या दोन गटात हाणामारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 21:13 IST

Aurangabad Shivsena: आज औरंगाबादेत वरुण सरदेसाई यांच्या उपस्थितीत युवासेनेच्या निश्चय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शिवसेनेच्या दोन गटात जोरदार हाणामारी झालेली पाहायाला मिळाली.

औरंगाबाद: आज औरंगाबादेत(Aurangabad) शिवसेनेच्या निश्चय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई(Varun Sardesai)  यांच्यासह मराठवाड्यातील सेनेचे अनेक नेते यावेळी उपस्थित होते. दरम्यान, या मेळाव्यानंतर शिवसेनेतला अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. कार्यक्रमानंतर शिवसेनेच्या दोन गटात हाणामारी झालेली पाहायला मिळाली. 

यापूर्वी अनेकदा शिवसेनेचा अंतर्गत वाद समोर आला आहे. आता औरंगाबादेतही तेच झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. निश्चय मेळाव्यानंतर शिवसेनेच्या दोन गटांत जोरदार मारमारी झाली आहे. युवासेनेचे अनेक कार्यकर्ते यावेळी भिडले. युवासेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या या राड्यामुळे वातावरण चांगलच तापले होते. काही वेळानंत वाद शांत झाला, पण यावरुन पुन्हा एकदा सेनेचा अंतर्गत वाद समोर आला आहे. 

राजेंद्र जंजाळे काय म्हणाले?या राड्यानंतर शिवसेनेचे नेते राजेंद्र जंजाळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. मारामारी करणारे आमचे कार्यकर्ते आहेत का? अशी शंका त्यांनी उपस्थित केली. आपसातील जुन्या वादातून हा प्रकार घडला असून, प्राथमिक माहितीप्रमाणे बजाजनगर ग्रामीण येथील हे कार्यकर्ते आहेत, अशी माहिती राजेंद्र जंजाळ यांनी दिली. तसेच मारामारी करणाऱ्यांची सगळी माहिती घेऊन कार्यक्रमाला गालबोट लावणाऱ्यांवर कारवाई केल्या जातील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

संबंधित बातमी- 'पुढचे 25 वर्षे उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री', वरुण सरदेसाईंकडून आदित्य आणि उद्धव ठाकरेंवर स्तुतीसुमने

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबादVarun Sardesaiवरुण सरदेसाई