शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

गावठी पिस्तूल बाळगणाऱ्यास स्थानिक गुन्हेशाखेकडून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 17:16 IST

पोलिसांनी पाठलाग करून घेतले ताब्यात

औरंगाबाद: कमरेला गावठी पिस्तूल लावून मिरवणाऱ्याला ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हेशाखेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी मोठ्या शिताफीने कृष्णापुर शिवारात पकडले. त्याच्याकडून गावठी पिस्तूल आणि तीन काडतुसे हस्तगत केली.

चरणसिंग शामसिंग काकरवाल(३०,रा. कृष्णापुर)असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. याविषयी ग्रामीण पोलिसांनी सांगितले की, कृष्णापुर येथील चरणसिंग नावाच्या तरूणाकडे एक पिस्तूल आहे. तो कमरेला पिस्तूल लावून फिरत असतो,अशी माहिती खबऱ्याने ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हेशाखेचे उपनिरीक्षक संदीप सोळुंके यांना मिळाली.यानंतर पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अप्पर अधीक्षक गणेश गावडे, पोलीस निरीक्षक भागवत फुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सोळुंके, कर्मचारी विठ्ठल राख, श्रीमंत भालेराव,धीरज जाधव, दिपक नागझरे, रामेश्वर धापसे,रमेश सोनवणे यांच्या पथकाने त्याचा शोध सुरू केला. तेव्हा तो कृष्णापुर येथील त्याच्या घराच्या परिसरात दिसला. पोलिसांना पाहुन तो पळून जाऊ लागला. 

पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले आणि त्याची कसून चौकशी केली असता तो उडवा,उडवीची उत्तरे देवू लागला. मात्र त्याच्याकडे गावठी पिस्तूल असल्याची पक्की खबर पोलिसांना असल्याने त्याला सोबत घेऊन त्याच्या घराची झडती घेण्यात आली.  घराच्या अंगणात वाळूमध्ये प्लास्टीक पिशवीत लपवून ठेवलेले गावठी पिस्तूल आणि तीन काडतुसे पोलिसांच्या हाती लागले. 

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी