शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

छुप्या पद्धतीने घरात दडवलेला २४ लाखाचा गुटखा जप्त; औरंगाबाद ग्रामीण गुन्हेशाखेची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 17:41 IST

लासूर स्टेशन आणि शिरेगाव येथील वेगवेगळ्या व्यक्तींच्या घरात छुप्या मार्गाने ठेवलेला २४ लाख २१ हजार रुपये किंमतीचा गुटखा ग्रामीण गुन्हेशाखेच्या पोलिसांनी धाडसत्र राबवून जप्त केला. हा गुटखा पुढील कारवाईसाठी अन्न व औषधी प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.

औरंगाबाद : लासूर स्टेशन आणि शिरेगाव येथील वेगवेगळ्या व्यक्तींच्या घरात छुप्या मार्गाने ठेवलेला २४ लाख २१ हजार रुपये किंमतीचा गुटखा ग्रामीण गुन्हेशाखेच्या पोलिसांनी धाडसत्र राबवून जप्त केला. हा गुटखा पुढील कारवाईसाठी अन्न व औषधी प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.

याविषयी अधिक माहिती देताना डॉ. सिंह म्हणाल्या की,  सिल्लेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध ठिकाणी गुटख्याचे गोडाऊन असून तेथूनच ग्रामीण भागातील गुटख्यांची होलसेल दरात विक्री होते. अशी माहिती खबर्‍यांकडून ग्रामीण गुन्हेशाखेला मिळाली होती. त्यानंतर अप्पर अधीक्षक डॉ. उज्वला वनकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सुभाष भुजंग, उपनिरीक्षक बी.जी. दुलत, व्ही.जी. जाधव, सहायक उपनिरीक्षक गफार पठाण, गणेश जाधव, वसंतराव लटपटे, विठ्ठल राख, विक्रम देशमुख, रंगराव बावस्कर, संजय काळे, रतन वारे, नवनाथ कोल्हे, रमेश अपसनवाड, संजय भोसले, अशिष जमधडे, राहुल पगारे, सागर पाटील, रामेश्वर धापसे, ज्ञानेश्वर मेटे, योगिता थोरात, सुरेखा वाघ, पुष्पांजली इंगळे, रजनी सोनवणे यांनी आज सर्वप्रथम शिरेगाव येथील दादासाहेब लक्ष्मण क-हाळे यांच्या घरावर छापा मारला. तेव्हा त्यांच्या घरासमोर उभ्या पिकअप वाहनामध्ये हिरा गुटख्याच्या ३८ गोण्या ,रॉयल टोबॅको

तंबाखूच्या १८ गोण्या भरलेल्या आढळल्या. याच गावातील दिनेश कैलास गोटे यांच्या घरात हिरा गुटख्याच्या ३४ गोण्या, रॉयल टोबॅकोच्या १७ गोण्या, तर गोवा गुटख्याच्या १२ गोण्या मिळाल्या. लासुरस्टेशन येथील सलीम जाहेद बेग यांच्या घरावर धाड मारली असता तेथील पिकअप गाडीत ६८ गोण्या हिरा गुटखा, रॉयल टोबॅकोच्या ३४ गोण्या, हिरा गुटख्याचे पाऊचचे ७ गोण्या असा सुमारे २४ लाख ३१ हजाराचा माल मिळाला. यासोबतच चार लाखाचे दोन पिकअप गाड्याही पोलिसांनी जप्त केल्या. या कारवाईने ग्रामीण भागातील गुटख्यांचा होलसेल धंदा करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे. जप्त गुटख्याच्या कारवाईची माहिती अन्न व औषधी प्रशासन विभागाला देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :PoliceपोलिसAurangabadऔरंगाबाद