शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘सुपर संभाजीनगर’ फलक लावला कोणी ? स्मार्ट सिटी प्रशासनाकडूनच नामांतराचे बीजारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 13:14 IST

Aurangabad renaming dispute : मागील महिन्यात टी.व्ही. सेंटर चौकात छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ ‘सुपर संभाजीनगर’ नावाचा बोर्ड लावण्यात आला आणि हा बोर्ड सोशल मीडियावर झळकताच राजकारण ढवळून निघाले.

ठळक मुद्देकेंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेतून पालिकेने अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले आहेत. शहरातील प्रत्येक चौकात या ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन सुंदर आर्ट इन्टॉलेशन बोर्ड लावण्याचे काम सुरू

औरंगाबाद : स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरात ठिकठिकाणी अत्याधुनिक फलक लावण्यात आले आहेत. ‘सुपर संभाजीनगर’ या बोर्डवरून राज्यभरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी औरंगाबाद शहराच्या नामांतरात उडी घेतली आहे. नामांतराच्या विषयाचे बीजारोपण स्मार्ट सिटी प्रशासनाकडून करण्यात आले. या पेटलेल्या प्रश्नावर महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी ‘नो कमेंट’ एवढीच प्रतिक्रिया नोंदवली.

स्मार्ट सिटीच्या नावीन्यपूर्ण उपक्रमातून टी.व्ही. सेंटर चौकात ‘सुपर संभाजीनगर’ नावाचा फलक लावला आहे. यामुळे राज्यभरात संभाजीनगरच्या नामांतराचा मुद्दा ऐरणीवर आला. सुपर संभाजीनगरचा फलक लावण्यास पालिकेने परवानगी कशी काय दिली? असा प्रश्‍न प्रशासक तथा आयुक्‍त आस्तिककुमार पाण्डेय यांना प्रसारमाध्यमांनी मंगळवारी विचारला. तेव्हा त्यांनी ‘नो कमेंट’ म्हणत या मुद्यावर मौन बाळगले. मात्र, यावेळी आयुक्‍तांनी दिलेले स्मितहास्य काही वेगळेच सांगून गेले. स्मार्ट सिटीने हा बोर्ड लावलाच नसल्याचे पाण्डेय यांनी सांगितले.

केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेतून पालिकेने अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले आहेत. शहरातील प्रत्येक चौकात या शहराचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन सुंदर आर्ट इन्टॉलेशन बोर्ड लावण्याचे काम सुरू आहे. याअंतर्गत आजवर एन-१ सिडको येथे ‘लव्ह औरंगाबाद’ नावाचा बोर्ड लावण्यात आला. याचे विमोचन पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. जालना रोडवरही अशाच पद्धतीचे बोर्ड अनेक ठिकाणी लावलेले आहेत. खडकेश्‍वर भागात शहराचा इतिहास सांगणारा ‘लव्ह खडकी’ या नावाने बोर्ड लावलेला आहे.

दरम्यान, या उपक्रमांतर्गतच मागील महिन्यात टी.व्ही. सेंटर चौकात छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ ‘सुपर संभाजीनगर’ नावाचा बोर्ड लावण्यात आला आणि हा बोर्ड सोशल मीडियावर झळकताच राजकारण ढवळून निघाले. राजकीय नेत्यांपासून ते विविध सामाजिक कार्यकर्त्यांकडून औरंगाबाद पालिकेने लावलेल्या या बोर्डवर टीका केली. काही जण पालिकेच्या या कृतीचे समर्थन करत आहेत, तर काहींकडून विरोध होत असल्याने शहरातील वातावरण तापलेले आहे. या बोर्डमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचा अहवाल पोलिसांनी वरिष्ठांना दिला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSmart Cityस्मार्ट सिटीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका