शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
3
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
4
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
5
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
9
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
11
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
12
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
13
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
14
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
15
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
16
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
17
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
18
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
19
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
20
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड

औरंगाबादमध्ये पोलिसांच्या ५३२ घरांचा प्रकल्प पूर्णत्वाकडे; पोलिसांना मिळणार उत्तम घरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 19:18 IST

पोलीस आयुक्तालयाच्या मागे टोलेजंग इमारती उभ्या

औरंगाबाद : पोलीस आयुक्तालयाच्या मागील जुनी पोलीस वसाहत पाडून तेथे सात मजली इमारती बांधण्यात येत आहेत. या अत्याधुनिक पोलीस वसाहतीचे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून, इलेक्ट्रिक फिटिंगचे काम अंतिम टप्प्यात आहे. दोन महिन्यांत या ५३२ आलिशान सदनिकांचे पोलिसांना वाटप होणार आहे.

शहर पोलीस दलात सुमारे साडेतीन हजार पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी पन्नास ते साठ टक्के पोलिसांनी शहरात त्यांची स्वत:ची घरे बांधलेली आहेत.उर्वरित पोलिसांना मात्र स्वत:ची घरे नसल्याने एक तर ते जुन्या पोलीस वसाहतीत किंवा भाड्याने घर घेऊन राहतात. नव्याने भरती होणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांकडून मात्र पोलीस वसाहतीमध्ये घर राहण्यास मिळावे, यासाठी प्रयत्न केला जातो. शहरात पोलीस आयुक्तालय, क्रांतीचौक आणि सिडको या ठिकाणी पोलीस वसाहती आहेत. क्रांतीचौक पोलीस वसाहतीमधील घरांना ४० हून अधिक वर्षे झाल्याने सर्व घरे जीर्ण होऊन मोडकळीस आली आहेत. यामुळे तेथे केवळ बोटावर मोजण्याएवढेच पोलीस कर्मचारी राहतात. अशाच प्रकारची अवस्था सिडको पोलीस वसाहतीत आहे. या वसाहतीमधील घरांची नियमित डागडुजी होत नसल्याने तेथील अनेक इमारतींमध्ये कुणीही राहत नाही. मोजक्याच वसाहतीत पोलीस कर्मचारी राहतात. 

या वसाहतीमध्ये नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने पोलीस कुटुंबियांचे हाल होत असतात. उपलब्ध घरे ही राहण्यायोग्य नाहीत. शिवाय आहे ती कमी पडत असल्याची समस्या लक्षात घेऊन तत्कालीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पोलीस आयुक्तालयामागील जुनी पोलीस वसाहत जमीनदोस्त करून तेथे ५३२ घरांचा प्रस्ताव शासनास सादर केला. शासनाने तो मंजूर केला. फेब्रुवारी २०१७ मध्ये या पोलीस वसाहतीचे काम सुरू झाले.आता वसाहतीचे बांधकाम पूर्ण झाले. आता केवळ वायरिंगचे काम सुरू असून, ते येत्या काही दिवसांत पूर्ण होईल, अशी माहिती पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांनी दिली. त्या म्हणाल्या की, या वसाहतीत पोलीस कर्मचाऱ्यांसाठी एक बेड, हॉल आणि किचन (वनबीएचके) तर पोलीस अधिकाऱ्यांसाठी टू बीएचके टाईपची घरे आहेत. तेथे ९ इमारतीत पोलीस कर्मचाऱ्यांसाठी ५०४ घरे, तर अन्य दोन इमारतींत पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यासाठी टाईप तीन प्रकारची २८ घरे बांधली जात आहेत.

150 कोटी 93 लाखांचा प्रकल्पपोलीस आयुक्तांचा जुना बंगला पाडून बंगल्याच्या मागील बाजूस दुसरा अलिशान बंगला बांधण्यात येत आहे. पोलीस आयुक्तांसोबतच पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांसाठीही स्वतंत्र निवासस्थानाचे बांधकाम पोलीस आयुक्तालय परिसरात सुरू आहे. पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची निवासस्थाने बांधकामासाठी तब्बल १५० कोटी ९३ लाख रुपये खर्च होत आहे. दोन महिन्यांत सर्व बांधकाम पूर्ण होणार असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

क्रांतीचौक पोलीस वसाहतीत 400 क्वॉटर्स बांधण्याचा प्रस्तावक्रांतीचौक पोलीस ठाण्यामागील जुनी पोलीस वसाहत पाडून तेथे पोलिसांसाठी तब्बल ४०० घरे बांधण्याचा प्रस्ताव आहे. यासोबतच हा प्रकल्प पीपीपी तत्त्वावर राबविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या तत्त्वानुसार तेथे व्यावसायिक गाळे बांधले जाणार आहे. त्यालगतच पोलीस वसाहत असेल. क्रांतीचौक पोलीस ठाणेही मुख्य रस्त्यावर स्थलांतरित करण्याचा विचार प्रशासनाचा असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :PoliceपोलिसHomeसुंदर गृहनियोजनAurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीस