शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

शहर पोलिसांना हव्यात सहा स्पीडगन; सुसाट जाणाऱ्या वाहनांना लगाम घालण्याचा विचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 17:31 IST

पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दरवर्षी लहान मोठे सरासरी दीड हजार अपघात घडतात.

ठळक मुद्दे शहरातील वाहनाचा वेग प्रतितास ४० कि़ मी. असा निश्चितपोलीस आयुक्तालयाने दोन वर्षांपूर्वी तीन स्पीडगन खरेदी केले

औरंगाबाद : वाऱ्याच्या वेगाने वाहने पळविणाऱ्या शहरातील वाहनचालकांना वेसण घालण्यासाठी पोलीस आयुक्तालयाने पोलीस महासंचालक कार्यालयाकडे सहा स्पीडगनची मागणी केली आहे.

पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दरवर्षी लहान मोठे सरासरी दीड हजार अपघात घडतात. वाहनांच्या वेगावर नियंत्रण नसणे, वाहतूक नियम न पाळल्याने अपघात घडत असल्याचे समोर आले आहे. अपघातातील मृत्यू आणि जखमींची संख्या कमी करण्यासाठी पोलिसांच्या वाहतूक विभागाकडून सतत प्रयत्न केले जातात. 

पोलीस आयुक्तांनी काही महिन्यांपूर्वी एक अधिसूचना जारी करून शहरातील वाहनाचा वेग प्रतितास ४० कि़ मी. असा निश्चित केला. तेव्हापासून शहरातील कोणत्याही वाहनचालकाला त्याचे वाहन ४० कि.मी. प्रतितास अशी वेगमर्यादा पाळणे बंधनकारक आहे. असे असताना सुसाट वाहनचालक वेगमर्यादा पाळत नसल्याचे समोर आले. सुसाट वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी पोलीस आयुक्तालयाने दोन वर्षांपूर्वी तीन स्पीडगन खरेदी केले होते. मात्र यापैकी दोन  स्पीडगन कायमस्वरुपी नादुरुस्त झाले. स्पीडगन अधूनमधून खराब होत असते. शिवाय दुरुस्तीनंतरही या स्पीडगन वारंवार खराब होत असतात. कधी त्यातून प्रिंट निघत नाही तर कधी त्यातून अचूक मोजमाप होत नाही. यामुळे या स्पीडगनचा वापर करणेही पोलिसांनी थांबविले आहे. प्रभावी कारवाई करता यावी, याकरिता पोलीस आयुक्तालयाने सहा स्पीडगनची मागणी पोलीस महासंचालक कार्यालयाकडे केल्याची माहिती उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांनी दिली.  

चार स्पीडगन मिळण्याची अपेक्षायाविषयी पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे म्हणाल्या की, वाहनाची वेगमर्यादा न पाळणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी स्पीडगनची आवश्यकता आहे. जुन्या स्पीडगन नादुरुस्त झाल्याने नवीन सहा स्पीडगन पोलीस आयुक्तालयास द्याव्या, अशी मागणी पोलीस महासंचालक कार्यालयास करण्यात आली. 

टॅग्स :PoliceपोलिसAccidentअपघातAurangabadऔरंगाबाद