शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या सभेसाठी औरंगाबाद पोलिसांकडून पर्यायी जागेचा प्रस्ताव; चेंडू आता मनसेच्या कोर्टात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 12:24 IST

मराठवाडा सांस्कृतिक मैदानात सभा घेण्यास पोलीस प्रशासनाने अद्याप परवानगी दिलेली नाही.

औरंगाबाद: मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी भोंग्यावरून राजकीय रान उठविले असून त्या पार्श्वभूमीवर येथे १ मे रोजी आयोजित केलेल्या जाहीर सभेवरून निर्माण झालेल्या वादंगाने बुधवारी वावटळीचे रूप धारण केले. सभा घेऊ नये यासाठी येणाऱ्या निवेदनांची संख्या वाढत असतानाच मनसे पदाधिकारी मात्र सभा घेण्यावर ठाम आहेत.

मराठवाडा सांस्कृतिक मैदानात सभा घेण्यास पोलीस प्रशासनाने अद्याप परवानगी दिलेली नाही. मात्र औरंगाबाद पोलिसांनी पर्यायी जागेचा प्रस्ताव मनसेसमोर ठेवला आहे. राज ठाकरेंची सभा गरवारे स्टेडियमवर घेण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे. मात्र मनसे ठरलेल्या ठिकाणीच सभा घेण्यास आग्रही आहे. तसेच मनसेकडून या सभेला उपस्थित राहण्यासाठी सोशल मीडियावर विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. 

दरम्यान, चार ते पाच संघटनांनी निवेदने देऊन राज ठाकरेंच्या सभेला परवानगी देऊ नये, अशी मागणी पोलीस व जिल्हा प्रशासनाकडे केली. त्यानंतर बुधवारी अ. भा. सेनेचे महेंद्र साळवे, सतीश म्हस्के यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना निवेदन देऊन सामाजिक शांतता अबाधित राहण्यासाठी सभेला परवानगी देऊ नये, अशी मागणी केली आहे. 

औरंगाबाद पोलीस आयुक्त निर्णय घेतील- गृहमंत्री वळसे पाटील

राज ठाकरे हे १ मे रोजी औरंगाबादमध्ये सभा घेणार आहेत. त्यांनी यासंदर्भात घोषणाही केली होती. परंतु त्यांच्या सभेला परवानगी नाकारण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडीसह काही जणांकडून करण्यात आली. यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, अशा प्रकारची कोणतीही निवेदनं गृहखात्याकडे आलेलं नाही. ती औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांकडे आली आहे. ते परिस्थिती पाहूनच निर्णय घेतील, असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं.

...तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा

राज ठाकरे यांच्या १ मे रोजी होणाऱ्या सभेला परवानगी दिल्यास भारिप तथा वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरून आंदोलन करील, असा इशारा नेते सुमित भुईगळ यांनी दिला आहे.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेAurangabadऔरंगाबाद