शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांची रजा पूर्ण; कचरा प्रश्न ‘जैसे थे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 19:30 IST

आयुक्तांच्या सक्तीच्या रजेचा कालावधी १५ एप्रिल रोजी पूर्ण होत असला तरी शहरातील कचऱ्याचा प्रश्न आजही ‘जैसे थे’ आहे.

औरंगाबाद : शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यावरून मिटमिटा येथे झालेल्या दंगलीची घटना व्यवस्थित न हाताळल्याच्या कारणावरून शहराचे पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना मुख्यमंत्र्यांनी एक महिन्यासाठी सक्तीच्या रजेवर पाठविले. आयुक्तांच्या सक्तीच्या रजेचा कालावधी १५ एप्रिल रोजी पूर्ण होत असला तरी शहरातील कचऱ्याचा प्रश्न आजही ‘जैसे थे’ आहे.

नारेगाव येथील कचरा डेपोमध्ये कचरा टाकू देण्यास विरोध करून परिसरातील नागरिकांनी आंदोलन सुरू केले. त्यानंतर उच्च न्यायालयाने आंदोलनकर्त्यांच्या बाजूने निकाल दिल्यानंतर शहरातील कचऱ्याची विल्हेवाट कशी आणि कोठे लावावी, असा प्रश्न मनपासमोर निर्माण झाला. शहरातील कचऱ्याची समस्या निर्माण होऊन ५७ दिवस उलटले. छुप्या मार्गाने आणि पोलीस बंदोबस्तात कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा मनपाचा प्रयत्न नागरिकांनी हाणून पाडला. ७ फेब्रुवारी रोजी मिटमिटा येथे कचरा टाकण्यावरून सुरू झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आणि तेथे दंगल झाली. आंदोलनकर्त्या नागरिकांच्या घराची दारे तोडून पोलिसांनी त्यांना अमानुष मारहाण केली. एवढेच नव्हे तर आंदोलनकर्त्यांप्रमाणे पोलिसांनी दगडफेक केली. नागरिकांच्या घरासमोरील वाहनांची तोडफोड केली.

याबाबतची व्हिडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने विविध लोकप्रतिनिधींनी हा प्रश्न विधानसभेत उचलून धरला. यावेळी शहरातील आमदारांनी आणि अन्य विधानसभा सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि राज्याचे पोलीस महासंचालक यांच्यामार्फत करण्याची घोषणा केली. विशेष म्हणजे ही चौकशी निष्पक्षपाती व्हावी, यासाठी पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना एक महिन्याच्या सक्तीच्या रजेवर पाठविले. पोलीस आयुक्त १६ मार्च रोजी रजेवर गेले. आयुक्तांच्या रजेचा कालावधी १५ एप्रिल रोजी पूर्ण होत आहे. आयुक्तांच्या रजेचा कालावधी समाप्त होत असला तरी शहरातील कचऱ्याचा प्रश्न अद्यापही सुटला नाही. 

यादव यांच्या परतण्याविषयी संभ्रमपोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी सक्तीच्या रजेवर जाताना पुन्हा परत येण्याची इच्छा नसल्याचे पत्रकारांना सांगितले होते. शहराचे प्रभारी पोलीस आयुक्त म्हणून विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे हे एक महिन्यापासून कामकाज पाहत आहेत. रजेच्या कालावधीत भारंबे यांनी आयुक्त यादव यांनी नेमलेले गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी कांबळे यांची तडकाफडकी बदली केली. शिवाय शहरातील वाहतूक व्यवस्थेवर चर्चासत्र घेतले. यामुळे भारंबे यांना आयुक्तपदी नियमित केले जाते अथवा नवा अधिकारी मिळतो किंवा यादवच राहतात, याबाबत आयुक्त ालयात संभ्रम आहे.

टॅग्स :Aurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसCommissioner Of Police Aurangabadपोलीस आयुक्त औरंगाबादTransferबदली