शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

प्रा. राजन शिंदे यांचा मारेकरी गजाआड, पण अद्याप अनेक प्रश्न अनुत्तरीत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2021 10:52 IST

चौकशीत अल्पवयीन मुलाने खूनाची कबुली दिली आणि हत्यारं घराजवळील विहिरीत टाकल्याचे सांगितले.

औरंगाबाद: शहरातील उच्चवर्गीय वसाहतीत राहणाऱ्या प्रा. राजन शिंदे यांचा खून चोरीच्या उद्देशाने झाला असावा, असा प्राथमिक अंदाज लावण्यात आला होता. पण, घरातून एकही वस्तू चोरीला गेली नाही आणि कुटुंबातील इतर सदस्यांना धक्काही लागला नाही. या परिस्थितीवरुन पोलिसांना वेगळाच वास आला. यानंतर पोलिसांनी वेगळ्या दिशेने तपास सुरू केला. प्रा. राजन शिंदे यांचे शहरात मोठे नाव होते, म्हणून स्वतः पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी या प्रकरणाचा तपास आपल्या हाती घेतला. 

पोलिसांसमोर पुरावा शोधण्याचे मोठे आवाहनया प्रकरणाच्या तपासात पोलिसांना ठोस पुरावे मिळत नव्हते. घरात कुठेही घरच्यांव्यतिरिक्त मारेकऱ्याच्या हाताचे, पावलांचे ठसे नव्हते. झटापट झाल्याच्या खुणाही नव्हत्या. तसेच, राजन शिंदे यांच्या पत्नी मनीषा शिंदे आणि इतर सदस्यांनाही काहीच कळाले नाही किंवा आवाज आला नाही. या सर्व गोष्टीमुळे पोलिसांचा कुटुंबियांवर संशय बळावला. यानंतर मोठ्या चौकशीअंती अल्पवयीन मुलाने खूनाची कबुली दिली आणि हत्यारं घराजवळील विहिरीत टाकल्याचे सांगितले. 

...पण अनेक प्रश्न अनुत्तरीतसर्व तपासानंतर पोलिसांनी 18 ऑक्टोबरला घटनेचा उलगडा केला. विहिरीतील पाणी काढून डंबेल, चाकू आणि रक्ताने माखलेला टॉवेल जप्त करण्यात आला. पण, अद्याप घटनेचा संपूर्ण उलगडा झालाच नाही. प्रा. राजन शिंदेंवर हल्ला होताना त्यांच्या पत्नी, मुलगी, आई-वडिलांना काहीच कसं कळालं नाही? त्यांना कुठलाच आवाज किंवा झटापटीचा आवाज आला नाही का ? प्रकरण कळालं तरी ते शांत कसे आहेत? त्यांनी आरोपीला अडवले का नाही ? शिंदेंची घरात वागणूक कशी होती? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अजून पोलिसांना मिळालेली नाहीत. हे प्रकरण वाटतं तितकं सरळं आणि सोपं नाही. कारण आरोपीने खूनाची कबुली दिली असली तरी, गुन्ह्यात त्याचा एकट्याचा सहभाग होता की, अजून कोणी त्याला मदत केली ? याचाही शोध लावणं महत्वाचं आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliceपोलिस