शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

महानगरपालिकेचा सुस्त कारभार; मंदगतीने रस्त्यांची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 16:45 IST

आठ महिन्यांत ४० टक्केही कामे पूर्ण नाहीत

ठळक मुद्देमहानगरपालिकेचे नियोजनच नाही पुण्याला गुणवत्ता तपासणी, बिले देण्यास विलंब

- मुजीब देवणीकर 

औरंगाबाद : महाराष्ट्र शासनाने दिलेल्या १०० कोटींच्या निधीतून शहरातील १९ रस्त्यांची कामे सुरू आहेत. आठ महिने उलटले तरी ४० टक्केही कामे पूर्ण झालेली नाहीत. याला फक्त मनपा प्रशासन कारणीभूत असल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे. रस्त्यांच्या कामाची गुणवत्ता तपासणी पुण्याला ठेवली आहे. कंत्राटदाराने जेवढे काम केले त्याचे बिल देण्यास तब्बल एक महिन्याचा विलंब प्रशासनाकडून लावण्यात येतो. त्यामुळे कामे मंदगतीने सुरू आहेत.

१०० कोटी रुपयांमध्ये शहरातील ३० रस्ते सिमेंट पद्धतीने गुळगुळीत करण्यात येणार आहेत. डिसेंबर २०१९ पर्यंत सर्व कामे संपायला हवीत. सप्टेंबर महिना उद्यापासून सुरू होत आहे. तरीही १९ रस्त्यांचीच कामे सुरू आहेत. ही कामेही अर्धवट अवस्थेत आहेत. एकाही रस्त्याचे काम सरसकट सुरू नाही. अनेक तुकड्यांमध्ये ही कामे करण्यात येत आहेत. कंत्राटदाराच्या मनात येईल तेथे काम सुरू आहे. प्रशासन म्हणून या कामांवर कुठेच अंकुश दिसून येत नाही. सिडको एन-५ ते बळीराम पाटील हा रस्ता एका बाजूने खडबडीत करून वाहतुकीसाठी बंद केला आहे. काम अजिबात सुरू नाही. टीव्ही सेंटर ते सेव्हन हिल, आझाद चौक ते बजरंग चौक, निराला बाजार ते महापालिका आदी रस्त्यांची कामे आता औरंगाबादकरांसाठी डोके दुखी ठरत आहेत. नेमके या कामांना विलंब कशासाठी होत आहे, याचा शोध घेण्याचा प्रयत्न ‘लोकमत’ने केला असता काही विदारक बाबी समोर आल्या.

गुणवत्ता तपासणी पुण्यालाशहरात सध्या १९ रस्त्यांची कामे सुरू आहेत. या कामांसाठी नियुक्त चार कंत्राटदार असून, ते थोडेही काम केले की बिल सादर करतात. कामाची गुणवत्ता पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील आणि   त्यांच्याच प्रयोगशाळेमार्फत करण्यात येते. पुण्याहून तज्ज्ञ आपल्या सोयीनुसार शहरात येतात. त्यांच्या पाहणीनंतर अहवाल येण्यास किमान एक महिन्याचा विलंब होतो. बिल अदा करण्यासाठी मनपा अधिकारी एक महिना लावतात.

एक महिन्यात सर्व कामे शक्य  मनपा प्रशासनाने गुणवत्ता तपासणी, बिल दाखल होताच दुसऱ्या दिवशी पैसे अदा केल्यास एका महिन्यात संपूर्ण कामे होऊ शकतात, असा दावा कंत्राटदारांमार्फत करण्यात आला आहे. ३० सप्टेंबरपर्यंत ७५ टक्के कामे शक्य आहेत. फक्त मनपा प्रशासनाची इच्छाशक्ती हवी. शंभर कोटींतील १५ कोटी रुपये मनपाने आतापर्यंत खर्च केले आहेत. सध्या मनपाकडे १० कोटींपेक्षा अधिकची बिले प्रलंबित आहेत.

दररोज दहा लाख खर्च एका कंत्राटदाराकडे किमान सहा ते आठ रस्त्यांची कामे दिली आहेत. एका कंत्राटदाराला दररोज १० लाख रुपये खर्च येतो. कंत्राटदार खिशातील पदरमोड करून कामे करण्यास तयार नाहीत. जेवढे काम झाले त्याचे पैसे घेऊनच पुढील कामे करीत आहेत. ही बाबही कामे मंदगतीने होण्यास कारणीभूत ठरत आहे.

पीएमसी, जीएसटीचा वाद३ जानेवारी रोजी टीव्ही सेंटर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ३० रस्त्यांचे एकत्रित भूमिपूजन झाले. यानंतर सुरुवातीचे तीन ते  चार महिने मनपाने नेमलेली पीएमसीच गायब झाली होती. त्यासोबत या कामांच्या जीएसटीची रक्कम नेमकी कोणी भरावी या मुद्यावरून कामे रेंगाळली होती. ज्या रस्त्यात ड्रेनेज लाईन, पाण्याच्या लाईन येत आहेत, त्या बाजूला करण्याचे काम मनपाचे होते. या कामांसाठी मनपा प्रशासनानेच विलंब लावला.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाfundsनिधीAurangabadऔरंगाबाद