शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

मनपाचे शिक्षणाधिकारी म्हणतात... विद्यार्थी हितासाठी नेमले नियमबाह्य शिक्षक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 17:28 IST

Aurangabad Municipal Corporation News : तासिका तत्त्वावरील फाईलची तपासणी केली असता, ९ फेब्रुवारी रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेचे कोणतेही इतिवृत्त नाही.

ठळक मुद्देशिक्षणाधिकारी यांच्याकडून चुकीचे समर्थन

- मुजीब देवणीकरऔरंगाबाद : महापालिकेतील शिक्षण विभागाने न झालेल्या सर्वसाधारण सभेचा उल्लेख करीत तब्बल दहा शिक्षकांच्या तासिका तत्त्वावर नेमणुका केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ९ फेब्रुवारी २०१९ रोजी कोणतीही सर्वसाधारण सभा झालीच नसल्याचे शिक्षणाधिकारी रामनाथ थोरे यांनी मान्य केले. मात्र, विद्यार्थी हितासाठी शिक्षकांची नेमणूक केल्याचा दावा त्यांनी केला. विशेष बाब म्हणजे या नियमबाह्य शिक्षक नियुक्तीप्रकरणी प्रशासनाने साधी चौकशीचीही तसदी घेतली नाही. (  Illegal teachers appointed case in Aurangabad Municipality )

महापालिकेत शिक्षणाधिकारी म्हणून प्रतिनियुक्तीवर शासनाकडून अधिकारी येतात. २०१७ ते २०२० पर्यंत शासनाकडून प्रतिनियुक्तीवर शिक्षणाधिकारी म्हणून श्रीकांत कुलकर्णी यांची नियुक्ती केली होती. त्यांच्या कार्यकाळातील हा नियुक्तीचा विषय असल्याचे विद्यमान प्रभारी शिक्षणाधिकारी थोरे यांनी सांगितले. तासिका तत्त्वावरील फाईलची तपासणी केली असता, ९ फेब्रुवारी रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेचे कोणतेही इतिवृत्त नाही. कारणापुरता उतारा नाही. तासिका तत्त्वावर शिक्षक नेमावेत असे महापौर, आयुक्त यांचे तोंडी आदेशही नाहीत. फाईलमध्ये फक्त ९ फेब्रुवारीच्या एकमेव सभेचा उल्लेख केला आहे. आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे, या फाईलवर तत्कालीन उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त यांच्या सह्या आहेत. कोणत्याही अधिकाऱ्याने सर्वसाधारण सभेचा ठराव कुठे आहे, अशी विचारणा शिक्षण विभागाला केलेली नाही. शिक्षण विभागावर विश्वास ठेवून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सह्या केल्या आहेत.आतापर्यंत शिक्षण विभागाने वेळोवेळी ५१ तासिका तत्त्वावरील शिक्षकांच्या नियुक्त्या केल्याचे शिक्षणाधिकारी थोरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मनपाच्या आस्थापनेवर ४१२, तासिका तत्त्वावरील ५१ मिळून ४६३ शिक्षक सध्या कार्यरत आहेत. १३ हजार ५०० विद्यार्थी संख्या असल्याचेही त्यांनी नमूद केले.

मला विद्यार्थीहित महत्त्वाचे वाटतेशिक्षण विभागाने न झालेल्या सभेचा वेळोवेळी उल्लेख करीत तासिका तत्त्वावरील शिक्षकांच्या नियुक्त्या केल्या आहेत. विद्यार्थीहित डोळ्यासमोर ठेवून हे काम केले असेल. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षक नेमले असावेत असे मला वाटते.- रामनाथ थोरे, प्रभारी शिक्षणाधिकारी, मनपा.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाEducation Sectorशिक्षण क्षेत्र