शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

औरंगाबाद महापालिकेचा बजेटमध्ये कोरोनाला ठेंगा; डीपीसीच्या अनुदानावरच लढा सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 19:38 IST

पालिकेत आता राजकीय ढवळाढवळ नाही, त्यामुळे प्रशासनाने कोरोनासाठी तरतूद वाढविली पाहिजे, अशी मागणी लोकप्रतिनिधी करीत आहेत.

ठळक मुद्देडीपीसीतून मनपाला निधी देणे थांबवा  लोकप्रतिनिधींची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

औरंगाबाद : महापालिकेने कोरोना नियंत्रणासाठी अर्थसंकल्पात ठेंगा दाखविला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या अनुदानावरच मनपा जर कोरोनाशी दोन हात करणार असेल तर त्यांना अनुदान देणे थांबवावे. जिल्ह्यात कोरोना नियंत्रणासह इतर विकासकामे ठप्प पडलेली आहेत. त्यामुळे मनपाला अनुदान देऊ नये, अशी मागणी काही लोकप्रतिनिधींनी मावळते जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे सोमवारी केल्याची माहिती समोर आली. 

महापालिका प्रशासकांनी गुरुवारी वर्ष २०२०-२१ साठी १ हजार ९३ कोटी उत्पन्नाचा व १ हजार ९२ कोटी ७० लाख खर्चाचा अर्थसंकल्प सादर केला. त्यात दीड ते २ टक्क्यांपेक्षा अधिक रक्कम आरोग्य सेवांसाठी नाही. मेल्ट्रॉन येथील कोविड सेंटर व साथरोग अनुषंगाने सर्व मिळून १५ ते २० कोटींच्या आत तरतूद केलेली आहे. कोरोना नियंत्रणावर जास्त भर देण्याऐवजी मनपाने ५२५ कोटी रुपये रस्ते व इतर कामांसाठी तरतूद केलेली आहे. जिल्हा नियोजन समितीतील एकूण बजेटपैकी २५ टक्के रक्कम कोरोना नियंत्रणासाठी ठेवण्यासाठी शासनाने अर्थसंकल्प सुधारित केला. मग मनपाने देखील त्याधर्तीवर निर्णय घेतला पाहिजे. पालिकेत आता राजकीय ढवळाढवळ नाही, त्यामुळे प्रशासनाने कोरोनासाठी तरतूद वाढविली पाहिजे, अशी मागणी लोकप्रतिनिधी करीत आहेत.

डीपीसीतून ३३ टक्के रक्कम जिल्हा प्रशासनाला मिळणार आहे. १०७ कोटींच्या आसपास ती रक्कम असून त्यात कोरोनासह विकासकामे करण्यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. राज्यातील इतर मनपा त्यांच्या फंडातून कोरोनाशी दोन हात करीत असताना औरंगाबाद मनपा मास्क, पीपीई, सॅनिटायझर, फेसशिल्डसाठी नियोजन समितीकडे हात पसरत आहे. डीपीसी आणि एसडीआरएफच्या निधीतून मनपाला आजवर १७ कोटी ६० लाख रुपये कोरोना नियंत्रणासाठी दिले आहेत. 

मावळते जिल्हाधिकारी चौधरी यांची माहितीमावळते जिल्हाधिकारी उदय चौधरी यांना याप्रकरणी विचारले असता ते म्हणाले, मनपाला आजवर एसडीआरएफ आणि डीपीसीतून १७ कोटी ६० लाख दिले आहेत. कोविड व इतर साथरोग नियंत्रणासाठी मनपाने अर्थसंकल्पात डीपीसीप्रमाणे २५ टक्के नाही तर १० ते १५ टक्के तरतूद करणे अपेक्षित आहे. डीपीसीचा खर्च प्रामुख्याने घाटी, पायाभूत सेवा बळकटीकरणासाठी वापरला जातो आहे, दैनंदिन खर्च मनपाने त्यांच्या पातळीवर भागविला पाहिजे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादfundsनिधीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद