शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेचा कॅनॉट परिसरातील अतिक्रमणावर हातोडा; कारवाईच्या निषेधार्थ मार्केट बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2023 16:04 IST

शहरात महापालिकेची अतिक्रमणविरोधात जोरदार मोहीम सुरु आहे.

औरंगाबाद: कॅनॉट मार्केटमधील सर्व दुकानांसमोर असलेले शेड काढण्याची कारवाई महापालिकेने आज सकाळी सुरू केली. अचानक सुरु झालेल्या कारवाईस व्यापाऱ्यांनी कडाडून विरोध दर्शविला. कारवाईच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी मार्केट बंद केले आहे. 

शहरात महापालिकेची अतिक्रमणविरोधात जोरदार मोहीम सुरु आहे. आज सकाळी मनपाचे अतिक्रमण विरोधी पथक शहरातील वर्दळीचा भाग कॅनॉट मार्केटमध्ये पोहचले. येथे व्यापाऱ्यांनी दुकानांच्या समोरील जागेत अतिक्रमण करून शेड उभारले आहे. मनपा पथकाने लागलीच शेड काढण्याची कारवाई सुरु केली. यामुळे एकच गोंधळ उडाला. व्यापाऱ्यांनी अतिक्रमण काढण्यास विरोध सुरु केला. यामुळे कारवाई काहीकाळ थांबविण्यात आली. प्रशासनाचा अतिक्रमण कारवाईच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी कॅनॉट मार्केट बंद केले. सर्व व्यापारी याबाबत महापालिकेत धाव घेऊन प्रशासकांकडे दाद मागणार आहेत. दरम्यान, व्यापाऱ्यांनी स्वतःहून शेड काढून घेणे सुरु केल्याची माहिती आहे.  

महापालिका परवानगीनेच शेडमहापालिकेतर्फे शेड उभारून देण्याचे सांगण्यात आले होते. मात्र, ते उभारण्यात आले नाही. त्यानंतर व्यापाऱ्यांनी स्वतः हँगिंग शेड उभारले. हे शेड अनेक वर्षांपासून आहेत. ऊन, पाऊस, वाऱ्यापासून सुरक्षा मिळावी म्हणून महापालिकेच्या परवानगीनेच हे हँगिंग शेड उभारण्यात आल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. हँगिंग शेड सोडून इतर अतिक्रमण काढण्यास विरोध नाही. असेही व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले. 

हायकोर्टाच्या आदेशाने कारवाईसिडको- हडकोतील अतिक्रमणा संदर्भात औरंगाबाद हायकोर्टाने एक समिती गठीत केली होती. समितीच्या अहवालानंतर हायकोर्टाच्या आदेशाने  महापालिकेने अतिक्रमण विरोधात कारवाई सुरु केली आहे. विरोधानंतर पथकाने स्वतःहून अतिक्रमण काढण्यासाठी व्यापाऱ्यांना तीन तासांची मुदत दिली. त्यानंतर पथक कारवाई करवाई करणार आहे. काही व्यापाऱ्यांनी स्वतःहून अतिक्रमण काढणे सुरु केले आहे. तसेच पथकाने जेसीबीच्या सहाय्याने मोठ्या अतिक्रमण काढले आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाEnchroachmentअतिक्रमण