शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका अगोदरच आर्थिक संकटात, त्यात तिसऱ्या लाटेचा आर्थिक भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 19:51 IST

Aurangabad Municipal Corporation News : राज्यातील महापालिकांना उचलावा लागेल तिसऱ्या लाटेचा आर्थिक भार

ठळक मुद्देनवीन जबाबदारी पेलणार कशी

- मुजीब देवणीकरऔरंगाबाद : कोरोनाच्या पहिल्या, दुसऱ्या लाटेत रुग्णसेवेसाठी राज्यातील सर्व महापालिकांना राज्य शासनाने आर्थिक मदत केली. त्यामुळे रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधाही मिळाल्या. संभाव्य तिसऱ्या लाटेत आता कोरोना रुग्णांचा संपूर्ण खर्च राज्यातील महापालिकांवर लादण्यात आल्याचा धक्कादायक निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. त्यामुळे अगोदरच आर्थिक संकटांना तोंड देणाऱ्या महापालिकांना आतापासूनच घाम फुटलाय.

मार्च २०१९ पासून कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. राज्यातील सर्वच महापालिकांनी आपली दैनंदिन कामे बाजूला ठेवून संपूर्ण यंत्रणा कोविडच्या कामाला लावली. बाधित रुग्ण शोधणे, वसाहती सील करणे, रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये ठेवणे, त्यांना दोन वेळ जेवण, नाश्ता, चहा, साबण, अंघोळीला बादली, गाद्या, आदी कितीतरी सोयी-सुविधा शासन आदेशानुसार देण्यात आल्या. या कामांसाठी लागणारा खर्च राज्य शासनाने जिल्हा प्रशासनामार्फत महापालिकांना दिला. त्यामुळे महापालिकांवर आर्थिक भार अजिबात पडला नव्हता. आता संभाव्य तिसऱ्या लाटेची तयारी राज्यातील सर्व महापालिकांनी स्वत:च्या निधीतून करावी, असे आदेश राष्ट्रीय आरोग्य अभियानचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन यांनी दिले. त्यामुळे राज्यातील मोठ्या दोन महापालिका वगळता इतर सर्व महापालिकांना घाम फुटला आहे. बहुतांश महापालिकांची आर्थिक स्थिती फारशी चांगली नाही. राज्य शासनाकडून दरमहा जीएसटीचा वाटा सर्वांना देण्यात येतो. त्यातून महापालिका कर्मचाऱ्यांचा पगार करतात. महापालिकांचे स्वत:चे आर्थिक स्रोत बळकट नाहीत. कोरोनामुळे तर मालमत्ता कर, पाणीपट्टी हे दोन मुख्य आर्थिक स्रोतही अटले आहेत.

सेवा अधिग्रहीत करू नयेराज्यातील काही महापालिकांनी आरोग्य सेवेसाठी शासनाच्या आरोग्य विभागातील सेवा अधिग्रहीत केली हाेती. राष्ट्रीय आरोग्य अभियान आयुक्तांनी काढलेल्या आदेशात शासकीय अधिकाऱ्यांवर अगोदरच शासनाने वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपविलेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या सेवा अजिबात अधिग्रहीत करण्यात येऊ नयेत. केले असेल तर ३१ ऑगस्टपूर्वी त्यांना कार्यमुक्त करावे. अन्यथा त्यांचा पगार महापालिकांकडून वसूल करण्यात येईल, असे म्हटले आहे.

औरंगाबाद मनपाची स्थितीकोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून आजपर्यंत औरंगाबाद महापालिकेने ९ लाख ८७ हजार ७८३ कोरोना चाचणी तपासण्यात केल्या. ८७ हजार ६२६ बाधित रुग्ण सापडले. शासनाकडून कोरोना निधी म्हणून मनपाला ५५ कोटी प्राप्त झाले. आणखी ६६ कोटी रुपयांची मागणी मनपाने शासनाकडे नोंदवली आहे. भविष्यात हा ६६ कोटींचा खर्च महापालिका आपल्या तिजोरीतून करूच शकत नाही. अशीच अवस्था राज्यातील ब, क, ड वर्गातील महापालिकांची आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्याAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका