शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदानाचा उत्साह कायम
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
5
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
6
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
7
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
8
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
9
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
10
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
11
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
12
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
13
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
14
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
15
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
16
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
17
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
18
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
19
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
20
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...

औरंगाबाद मनपाचा लेखा विभाग अडचणीत; राज्य शासनाच्या निधीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 3:45 PM

जीएसटीपोटी राज्य शासनाकडून दर महिन्याला येणारे २० कोटी रुपये अद्याप प्राप्त झाले नाहीत. फेब्रुवारी महिन्याचा पहिला आठवडा उलटला तरी पगारासाठी पैसे नाहीत. निवृत्त कर्मचारी पेन्शनसाठी लेखा विभागाचे उंबरठे झिजवत आहेत.

ठळक मुद्देफेब्रुवारी महिन्यातही मालमत्ता कर, पाणीपट्टीच्या वसुलीत फार काही सुधारणा झालेली नाही. नगररचना विभागात अधिकारी नसल्याने तेथूनही महसूल येणे बंद झाले आहे. जीएसटीपोटी राज्य शासनाकडून दर महिन्याला येणारे २० कोटी रुपये अद्याप प्राप्त झाले नाहीत.

औरंगाबाद : जीएसटीपोटी राज्य शासनाकडून दर महिन्याला येणारे २० कोटी रुपये अद्याप प्राप्त झाले नाहीत. फेब्रुवारी महिन्याचा पहिला आठवडा उलटला तरी पगारासाठी पैसे नाहीत. निवृत्त कर्मचारी पेन्शनसाठी लेखा विभागाचे उंबरठे झिजवत आहेत. अशा अनेक संकटात महापालिकेचा लेखा विभाग घेरल्या गेला असतानाच मुख्य लेखाधिकारी राम सोळुंके दीड महिन्याच्या दीर्घ सुट्टीवर निघून गेले. त्यांचा अतिरिक्त कार्यभार आता उपमुख्य लेखापरीक्षक महावीर पाटणी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

फेब्रुवारी महिन्यातही मालमत्ता कर, पाणीपट्टीच्या वसुलीत फार काही सुधारणा झालेली नाही. नगररचना विभागात अधिकारी नसल्याने तेथूनही महसूल येणे बंद झाले आहे. जानेवारी महिन्याचा पगार करण्यासाठी तिजोरीत १५ कोटी रुपये नाहीत. तिजोरीतील जेमतेम रकमेवर निवृत्त कर्मचार्‍यांचे पेन्शन देता येईल. यावरही ३ कोटी रुपये खर्च येतो. पेन्शन वाटपापूर्वीच मुख्य लेखाधिकारी सोळुंके सुट्टीवर गेले. त्यांचा अतिरिक्त कार्यभार मुख्य लेखापरीक्षक दीपाराणी देवतराज यांनी स्वीकारण्यास नकार दिला. लेखाधिकारी संजय पवार यांना पदभार देण्याची प्रशासनाची मानसिकता  नाही. कार्यभार कोणाला द्यावा या चिंतेत प्रशासन होते. बुधवारी सायंकाळी वॉर्ड अधिकारी म्हणून काम पाहणारे उपमुख्य लेखापरीक्षक महावीर पाटणी यांच्याकडे मुख्य लेखाधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला.