शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद बाजारपेठेत जुनी तूर डाळ मंदीत; करडी तेल तेजीत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 12:17 IST

बाजारगप्पा : आजघडीला साठेबाज व्यापाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात जुन्या तूर डाळीचा साठा शिल्लक आहे.

- प्रशांत तेलवाडकर ( औरंगाबाद )

वर्षाच्या अखेरच्या आठवड्यात औरंगाबाद बाजारपेठेत तूर डाळीच्या भावात मंदी आली होती, तर करडी तेलात आणखी भाववाढ झाली. अन्य डाळी, धान्याचे भाव स्थिर होते. 

मागील आठवडा थंडीने गाजवला. किराणा सामानाच्या तेजी-मंदीपेक्षा आज तापमान किती अंश सेल्सिअसने कमी झाले याचीच चर्चा अधिक होती. बाजारपेठेत नवीन तुरीची आवक वाढू लागताच जुन्या तूर डाळीच्या भावात मंदीला सुरुवात झाली. कारण, आजघडीला साठेबाज व्यापाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात जुन्या तूर डाळीचा साठा शिल्लक आहे. मागील वर्षी तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले होते. मोठ्या प्रमाणात तूर शासनाने खरेदी केली होती. ५ ते ६ महिन्यांपूर्वी नाफेडने जुन्या तूर डाळीचे खुल्या बाजारासाठी विक्रीचे टेंडर काढले होते. यात ३७०० ते ३८०० रुपये प्रतिक्विंटलने व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात डाळ खरेदी केली होती.

यंदा खरीप हंगामात तुरीचे उत्पादन घटल्याने तूर डाळीचे भाव ८० ते १०० रुपये किलोपर्यंत जातील, अशी अपेक्षा साठेबाजांना होती; मात्र नवीन तुरीची आवक सुरू झाली असून, ४८०० ते ५००० रुपये प्रतिक्विंटल तुरीला भाव मिळत आहे. त्यात जुना साठा मोठ्या प्रमाणात असल्याने साठेबाजांनी बाजारात जुनी तूर डाळ विक्रीला आणली. ६८०० ते ७००० रुपये प्रतिक्विंटल विक्री होणाऱ्या तूर डाळीचे भाव गडगडले व शनिवारपर्यंत ५९०० ते ६४०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली येऊन थांबले. क्विंटलमागे हळूहळू ६०० ते ९०० रुपयांनी भाव घसरले. साठेबाज व्यापारी येत्या काळात नवीन तूर डाळीत जुनी डाळ मिसळून ती बाजारात विक्रीला आणतील, याची शक्यता नाकारता येत नाही. यंदा तुरीचे उत्पादन कमी असल्याने आणखी मंदी येण्याची शक्यता कमी असल्याचेही व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. 

मागील आठवड्यात  करडी तेलाचा भाव आणखी ५०० रुपयांनी वधारून १५५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत जाऊन पोहोचला आहे. यामुळे किरकोळमध्ये ५ रुपयांनी महागून करडी तेल १४५ ते १५० रुपये प्रतिलिटर विक्री होत आहे. नवीन करडी येण्यास आणखी दोन महिन्यांचा कालावधी बाकी आहे. वसंतपंचमीला नवीन करडी बाजारात येईल, तोपर्यंत किती भाववाढ होते, हे सांगणे सध्या कठीण आहे. थंडीमुळे पामतेल घट्ट होत असल्याने मागणी घटली होती. बाकीच्या खाद्यतेलाचे भाव स्थिर होते. 

केंद्र सरकारने जानेवारी महिन्यासाठी १८.५० लाख मेट्रिक टन साखर कोटा जाहीर केला आहे.  शनिवारी याची घोषणा करण्यात आली. डिसेंबर महिन्यासाठी १९.५० लाख मे. टन साखर कोटा देण्यात आला होता. त्यापेक्षा नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात १ लाख टनने कोटा कमी देण्यात आला आहे. औरंगाबाद शहराचा विचार करता दररोज २००० ते २२०० क्विंटल साखर विक्री होते. कोटा जाहीर झाला तेव्हा साखर एस (बारीक) ३१५० रुपये, सुपर एस (मध्यम) ३२०० रुपये, तर एम (जाड) ३२५० ते ३३०० रुपये प्रतिक्विंटल विक्री झाली.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी