शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

विशेष रेल्वेंच्या यादीतून औरंगाबाद गायबच; उन्हाळी सुट्यांत गर्दीतूनच करावा लागणार प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2022 20:20 IST

तिरुपती आणि रेल्वेच्या परीक्षार्थींसाठी जबलपूरपुरतीच विशेष रेल्वे

औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेच्या विविध विभागांतून उन्हाळी सुट्यांत विशेष रेल्वे सोडण्यात येत आहेत. मात्र, या विशेष रेल्वेच्या यादीतून औरंगाबाद गायब आहे. केवळ तिरुपतीसाठी आठवड्यातून एक दिवस विशेष रेल्वे सोडण्यात येत आहे. इतर शहरांसाठी विशेष रेल्वे सोडण्यात येत नसल्याने गर्दीतूनच प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर ओढवत आहे.

उन्हाळी सुट्यांमुळे अनेकांकडून पर्यटनाचे नियोजन केले जात आहे, तर अनेक जण गावी जात आहेत. रेल्वेला प्राधान्य देणाऱ्यांची संख्या मोठी आहे. सध्या अनेक रेल्वेंचे आरक्षण फुल्ल आहे. अशा परिस्थितीत द. म. रेल्वेकडून विशेष रेल्वे सोडण्यात येत आहेत. परंतु औरंगाबादकडे काहीसे दुर्लक्षच होत आहे. मे महिन्यात आठवड्यातून एक दिवस औरंगाबाद-तिरुपती विशेष रेल्वे सोडण्यात येत आहे. परंतु गोवा, केरळ, राजस्थान, जयपूर, बंगळुरूसाठी विशेष रेल्वे सोडण्याची मागणी प्रवाशांतून होत आहे. प्रत्येक उन्हाळ्यात मागणी करूनही विशेष रेल्वे सोडण्याकडे कानाडोळा केला जातो. वाढीव बाेगी आणि एखाद्या विशेष रेल्वेवरच प्रवाशांना समाधान मानावे लागते, अशी ओरड रेल्वे संघटनांतून होत आहे.

जबलपूरसाठी कधी रेल्वे?रेल्वे भरती बोर्ड नाॅन टेक्निकल पाॅप्युलर कॅटेगरीच्या परीक्षार्थींसाठी ७ मे रोजी जबलपूर ते नांदेड आणि ९ मे रोजी नांदेड ते जबलपूर विशेष रेल्वे चालविण्यात येणार आहे. नांदेड-जबलपूर ही रेल्वे ९ मे रोजी नांदेडहून औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर रात्री १.२० वाजता येईल आणि रात्री १.२५ वाजता रवाना होईल.

नेहमीच दुर्लक्षऔरंगाबादहून विशेष रेल्वे सोडण्याकडे नेहमीच दुर्लक्ष केले जात आहे. वारंवार मागणी करूनही गोवा, केरळ, राजस्थान, बंगळुरूसाठी विशेष रेल्वे सोडण्यात येत नाही. इतर शहरांसाठी कधी विशेष रेल्वे देणार, असा प्रश्न आहे.- ओमप्रकाश वर्मा, अध्यक्ष, मराठवाडा रेल्वे विकास समिती

टॅग्स :tourismपर्यटनAurangabadऔरंगाबादRailway Passengerरेल्वे प्रवासीrailwayरेल्वे