शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

दिवसभरात ५० विमाने हाताळण्याची औरंगाबाद विमानतळाची क्षमता स्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 11:46 IST

शिर्डीतील खराब वातावरणाने विमानांच्या उड्डाणांनी क्षमता झाली स्पष्ट

ठळक मुद्दे नियमित आणि अतिरिक्त अशा २० विमानांची दिवसभरात ये-जा होत होती. भविष्यात विमानसेवा वाढण्यासाठी ही बाब महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाची दिवसभरात ५० विमाने हाताळण्याची क्षमता आहे. स्पाईस जेट आणि इंडिगोच्या विमानांचे शिर्डी विमानतळावरून होणारे उड्डाण खराब वातावरणामुळे काही दिवसांसाठी औरंगाबाद विमानतळावरून झाले.  नियमित आणि अतिरिक्त अशा २० विमानांची दिवसभरात ये-जा होत होती. त्यातून औरंगाबाद विमानतळाची क्षमता स्पष्ट झाली असून, भविष्यात विमानसेवा वाढण्यासाठी ही बाब महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 

स्पाईस जेटने चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, बंगळुरूहून शिर्डीला जाणारी विमाने २२ नोव्हेंबरपासून औरंगाबादहून उड्डाण करीत होते. स्पाईस जेटपाठोपाठ ‘इंडिगो’नेही औरंगाबादहून विमानांचे संचालन करण्याचे नियोजन केले. बुधवारपासून स्पाईस जेटची विमाने पूर्वीप्रमाणे शिर्डीहून झेपावण्यास सुरुवात झाली. तर  इंदूर, हैदराबाद आणि बंगळुरू शहरांसाठी ‘इंडिगो’चे विमान १५ डिसेंबरपर्यंत औरंगाबादहून ये-जा करणार आहे. स्पाईस जेटची अतिरिक्त विमानसेवा कमी झाली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून विमानतळावर वाढलेली गजबज आता कमी झाली आहे. १५ डिसेंबरनंतर विमानतळावर केवळ नियमित विमानांच्या प्रवाशांची गर्दी राहिल. 

चिकलठाणा विमानतळावरून नियमित १० विमानांची ये-जा आहे. यामध्ये उदयपूरचे विमान आठवड्यातून ३ दिवसांसाठी उड्डाण घेत आहे. चिकलठाणा विमानतळाची दिवसभरात ५० विमाने हाताळण्याची क्षमता असल्याचे विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे यांनी सांगितले. शिर्डी येथील विमाने औरंगाबादला वळविण्यात आल्याने गेली काही दिवस दिवसभरात उड्डाण घेणाºया विमानांची संख्या २० वर गेली होती.  वाढलेल्या विमानांची आणि प्रवासी संख्येची सक्षमपणे हाताळणी केली गेली. त्यातून औरंगाबाद विमानतळ व्यवस्थापनाची क्षमता स्पष्ट होत आहे. याचा भविष्यात विमानसेवा वाढण्याच्या दृष्टीने फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

औरंगाबादमुळे स्लॉट वाचलेशिर्डी येथील खराब वातावरणामुळे तेथील विमानतळावरील विमानांचे उड्डाण ठप्प झाले होते. अधिक दिवस उड्डाण ठप्प राहिल्यास विमानांचे ‘स्लॉट’ (उड्डाणाची वेळ) रद्द होण्याची शक्यता असते. मात्र स्लॉट कायम राहण्याच्या दृष्टीने औरंगाबादहून उड्डाण करण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळShirdi Airportशिर्डी विमानतळAurangabadऔरंगाबादtourismपर्यटनairplaneविमान