शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगमंत्र्यांना दणका;शिवसेना पदाधिकाऱ्यास ‘विनानिविदा’ मंजूर भूखंडाचा ताबा घेण्यास मज्जाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 14:20 IST

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यास ‘विनानिविदा’ भूखंड मंजूर केल्याचे प्रकरण

औरंगाबाद : उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या आदेशाने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यास विनानिविदा मंजूर केलेल्या औरंगाबादेतील शेंद्रा पंचतारांकित एमआयडीसीमधील भूखंडाचा ताबा घेऊ नये. तसे पोलिसांना कळवावे, असा आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. आर.डी. धानुका आणि न्या. एस.जी. मेहरे यांनी दिला आहे. राज्याचे उद्योग सचिव, उद्योगमंत्री सुभाष देसाई, खा. विनायक राऊत, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शशिकांत वडळे यांना नोटिसा बजावण्याचा आदेश खंडपीठाने दिला आहे. याचिकेवर ४ एप्रिल रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

वैशाली इंडस्ट्रीजला २०१२ ला शेंद्रा एमआयडीसीमध्ये भूखंड (क्रमांक ए-२) मंजूर झाला होता. त्यांनी तेथे उद्योग सुरू केला होता. तेथे २०१५ आणि २०१९ ला मोठी आग लागली होती. त्याबाबत पोलिसांत तक्रार देऊन विमा कंपनीकडे भरपाईचा दावा दाखल केला, तो प्रलंबित आहे. कंपनीने बांधकाम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र घेतले नव्हते. त्यांना दोनदा मुदतवाढ दिल्यानंतर २०१९ ला एमआयडीसीने भूखंड वाटपच रद्द केले. त्याविरुद्ध दाखल केलेली याचिका प्रलंबित आहे. याचिकाकर्त्याला कोविडमुळे दोन वर्षे पुढील कारवाई करता आली नाही.

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची मागणीशिवसेनेचे पदाधिकारी शशिकांत वडळे यांनी उद्योगमंत्री देसाई यांना अर्ज देऊन वैशाली इंडस्ट्रीजच्या रद्द केलेल्या भूखंडाची मागणी केली. विशेष म्हणजे अर्ज केला, तेव्हा त्यांची कंपनी अस्तित्वात नव्हती. अर्जातच त्यांनी नियोजित (प्रपोज्ड) कंपनीला भूखंड देण्याची मागणी केली होती. खा. विनायक राऊत यांनी उद्योगमंत्र्यांना वडळे यांना भूखंड देण्याची विनंती केली होती.

निविदा प्रक्रियेला स्थगितीवैशाली कंपनीच्या रद्द केलेल्या भूखंडाच्या वाटपासाठीची ई-निविदा प्रक्रिया स्थगित करून वडळे यांच्या नियोजित कंपनीला ‘तो’ भूखंड देण्याच्या कारवाईचे आदेश एमआयडीसीचे पदसिद्ध अध्यक्ष तथा उद्योगमंत्री देसाई यांनी एमआयडीसीला दिले होते. त्यांनी कुठल्याही प्रक्रियेचा अवलंब न करता तो भूखंड वडळे यांना मंजूर केला होता. त्यांनी त्या भूखंडाचा ताबा याचिकाकर्त्या वैशाली कंपनीकडून घेण्यासाठी पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी ११ मार्च २०२२ रोजी केली. म्हणून ॲड. सिद्धेश्वर एस. ठोंबरे यांच्यामार्फत याचिका दाखल करून विनानिविदा वडळे यांना मंजूर केलेला भूखंड रद्द करण्याची व याचीकाकर्त्याकडील भूखंडाचा ताबा घेऊ नये, अशी विनंती केली आहे.

टॅग्स :Subhash Desaiसुभाष देसाईAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठMIDCएमआयडीसी