शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांसाठी समाधान हेल्पलाईन सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 13:57 IST

पोलीस कर्मचाऱ्यांच्या कोणत्याही तक्रारी मांडण्यासाठी आयुक्तालयाकडून समाधान हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे.

औरंगाबाद : पोलीस आयुक्तालयातील कनिष्ठ लिपिकाला सोमवारी पाचशे रुपयांच्या लाचेप्रकरणी अटक केली होती. या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांच्या कोणत्याही तक्रारी मांडण्यासाठी पोलीस आयुक्तालयाकडून समाधान हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. पोलिसांनी हे दक्षतेचे व सतर्कतेचे पाऊल उचलले आहे.

पोलीस आयुक्तालयांतर्गत जवळपास तीन हजार पोलीस अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांची विविध कामे मुख्यालय, पोलीस ठाणे स्तरावर असतात. ही कामे वेळेवर होत नाहीत, विलंबाने केली जातात, मुद्दामहून अडवून ठेवली जातात किंवा कामांसाठी लाचही मागितली जाते.  पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद रुजू झाल्यापासून त्यांनी हळूहळू पोलीस प्रशासनाला कार्यक्षम बनविण्यावर भर दिला आहे. कर्मचाऱ्यांच्या तक्रारी गांभीर्याने घेतल्या जात आहेत. लाच घेताना एकाला अटक होताच पोलीस आयुक्तांनी हे प्रकार टाळण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. कोणत्याही कर्मचाऱ्याची कोणतीही अडवणूक होऊ नये यासाठी पोलिसांनी समाधान हेल्पलाईन (०२४०-२३२६५२७) सुरू केली आहे.

हेल्पलाईन चार महिन्यांपूर्वीच तयार या हेल्पलाईनवर कर्मचारी बिनधास्तपणे आपल्या तक्रारी मांडू शकणार आहेत. खरे तर ही हेल्पलाईन चार महिन्यांपूर्वीच तयार करण्यात आली होती; परंतु याबाबत कर्मचाऱ्यांना फारशी माहिती नसल्याने या हेल्पलाईनला प्रतिसादही मिळाला नव्हता. आता या प्रकरणानंतर पुन्हा हेल्पलाईन अ‍ॅक्टिव करण्यात आल्याची माहिती उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांनी दिली आहे.

टॅग्स :Aurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसPoliceपोलिसAurangabadऔरंगाबाद