शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

औरंगाबाद कचरा प्रश्न : खदानींनाही विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2018 12:08 AM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी महापालिकेला कचरा प्रश्नात खदानींचा पर्याय दिला होता. गुरुवारी शहराच्या आसपास असलेल्या खदानींची पाहणी करण्यात आली. प्रत्येक ठिकाणी महापालिकेला नागरिकांनी कडाडून विरोध केला.

ठळक मुद्देचार ठिकाणी पाहणी : सावंगी, सातारा- देवळाईचे नागरिकही रस्त्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी महापालिकेला कचरा प्रश्नात खदानींचा पर्याय दिला होता. गुरुवारी शहराच्या आसपास असलेल्या खदानींची पाहणी करण्यात आली. प्रत्येक ठिकाणी महापालिकेला नागरिकांनी कडाडून विरोध केला. कचरा टाकण्यासाठी काही जागांचीही चाचपणी केली असता पंंचक्रोशीतील नागरिकांनी पाहणी पथकाला ‘गो बॅक’ची नम्रपणे सूचना केली.गुरुवारी सकाळी महापौर बंगल्यावर खा. चंद्रकांत खैरे यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सुचविल्याप्रमाणे काही खदानींच्या जागा पाहण्याचा निर्णय घेण्यात आला.दुपारी महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे, सभापती गजानन बारवाल, सभागृहनेता विकास जैन, आयुक्त डी. एम. मुगळीकर, उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल, अप्पर तहसीलदार रमेश मुंडलोड, शहर अभियंता एस. डी. पानझडे, कार्यकारी अभियंता सिकंदर अली, असा ताफा चौका येथे जाणार होता.ऐनवेळी कार्यक्रमात बदल करून जटवाडा भागातील गोल्फ क्लबची जागा पाहण्यात आली. याठिकाणी आसपासचे नागरिक हळूहळू विरोधासाठी जमत होते. त्यापूर्वीच ताफा पुढे निघाला.मिटमिट्यात दंगल; खंडपीठात जनहित याचिका सादरऔरंगाबाद : शहरातील कचरा टाकण्यावरून बुधवारी मिटमिटा येथे दंगल पेटली होती. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि. ८ मार्च) औरंगाबाद खंडपीठात ‘जनहित याचिका’ सादर झाली आहे. या याचिकेवर शुक्रवारी (दि.९ ) सुनावणी अपेक्षित आहे.मिटमिट्याच्या घटनेची कायदेशीर चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मुख्य विनंती करणारी याचिका मिटमिट्याचे रहिवासी अ‍ॅड. अशोक मुळे यांनी सादर केली आहे. त्यांच्या वतीने अ‍ॅड. विजयकुमार डी. सपकाळ काम पाहत आहेत.मिटमिटा येथील सफारी पार्कसाठी आरक्षित असलेल्या गट नंबर ३०७ आणि रहिवासी प्रयोजनासाठी आरक्षित असलेल्या गट नंबर ५४ येथे मनपाने शहरातील कचरा टाकला. यामुळे परिसरातील पिण्याच्या पाण्याला धोका निर्माण झाला आहे.शहर विकास आराखड्यानुसार राखीव जागा अन्य उद्देशासाठी वापरू नये, असा मनाई हुकूम द्यावा, अशी विनंती याचिकेद्वारे करण्यात आली आहे.याचिकेत केंद्र शासन, राज्य शासन, राज्याचे मुख्य सचिव, शहर विकास विभागाचे सचिव, पुरातत्व विभागाचे औरंगाबादचे अधीक्षक, विभागीय आयुक्त, मनपा आयुक्त आणि महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना प्रतिवादी केले आहे.डोंगरात विशाल खदानीस्टेपिंग स्टोन शाळेच्या पाठीमागील डोंगरात महसूल विभागाच्या दोन खदानी आहेत. लाखो मेट्रिक टन कचरा या खदानींमध्ये अनेक वर्षे बसू शकेल एवढ्या मोठ्या या खदानी आहेत. या खदानींची पाहणी करण्यात आली. मात्र, गावकºयांचा विरोध झुगारून कचरा टाकणार कसा? खदानींसाठी दुसरा पर्यायी रस्ता सापडू शकतो का? याचाही आढावा घेण्यात आला.सावंगीत रस्ता अडविलाच्महापालिकेचा ताफा सावंगी येथे खदानींच्या पाहणीसाठी पोहोचला. त्यापूर्वीच गावातील असंख्य नागरिक पाहणी पथकाच्या स्वागताला उभे होते. त्यांनी खदानीकडे जाणाºया रस्त्यावर ट्रॅक्टर, काटे टाकून ठेवले होते. खा. खैरे, महापौर घोडेले, आयुक्तमुगळीकर यांनी नागरिकांची बरीच समजूत घातली; पण नागरिकांनी काहीही ऐकून घेतले नाही. या भागात कचरा अजिबात टाकू देणार नाही, अशी भूमिका गावकºयांनी मांडली.