शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमधील छावणी पोलीस ठाण्यात संभाजी भिडे व मिलिंद एकबोटेंविरोधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 08:11 IST

भीमा-कोरेगाव येथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी औरंगाबादेतून गेलेल्या पथकावर हल्ला करून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात मिलिंद एकबोटे, मनोहर उर्फ संभाजी भिडे, अनिल दवे यांच्यासह २० ते २५ जणांविरोधात दंगल करणे, मारहाण करणे, वाहनांचे नुकसान करणे, जातीवाचक शिवीगाळ करणे आदी कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

औरंगाबाद : भीमा-कोरेगाव येथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी औरंगाबादेतून गेलेल्या पथकावर हल्ला करून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे अनिल दवे यांच्यासह 20 ते 25 जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.  दंगल करणे, मारहाण करणे, वाहनांचे नुकसान करणे, जातीवाचक शिवीगाळ करणे आदी कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हा गुन्हा पुणे ग्रामीणमधील शिक्रापूर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला.

छावणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भावसिंगपुरा परिसरातील पेठेनगर येथील रहिवासी जयश्री सुदाम इंगळे या अन्य काही सहकार्‍यांसह 1 जानेवारीला पुणे जिल्ह्यातील भिमा कोरेगाव येथे विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी आरोपींनी तक्रारदारांची गाडी अडवून त्यांच्यावर दगडफेक आणि लाठ्यांचा वर्षाव करून गाडीच्या काचा फोडल्या. तसेच तक्रारदार यांना जातीवाचक शिवीगाळ केली. यावेळी फिर्यादीसोबतच्या एकाने तहान लागल्याने आरोपींना पाणी मागितले असता त्यांनी पाणी देण्यास नकार देत त्यांच्यावर बहिष्कार टाकला.

औरंगाबादला परतल्यानंतर तक्रारदार यांनी 3 जानेवारीला रात्री छावणी पोलीस ठाणे गाठून उपायुक्त विनायक ढाकणे, छावणी ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महादेव पुरी यांची भेट घेऊन याप्रकरणी तक्रार नोंदविली. छावणी पोलिसांनी त्यांची फिर्याद नोंदवून घेत पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर पोलीस ठाण्याला वर्ग केली. या गुन्ह्याचा तपास आता शिक्रापूर पोलीस करणार असल्याचे छावणी पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचार