शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
3
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
4
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
5
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
6
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
7
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
8
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
9
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
10
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
11
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
12
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
13
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
14
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
15
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
16
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."
17
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
18
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
19
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
20
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त

आंधळं दळतंय...निवडणुकी दरम्यान पोलिसांनी भरल्या ३ मृतांवर ‘चॅप्टर केसेस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 16:41 IST

गु्न्हेगारांविरूद्ध कारवाईची संख्या वाढविताना प्रमाद

ठळक मुद्देपोलीस आयुक्तांनी गुन्हे असलेल्या व्यक्तींविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे दिले होते आदेशनिवडणुकी दरम्यान जास्त प्रतिबंधात्मक केसेस करण्यावर ठाणेदारांचा भर होता.

- बापू सोळुंके 

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत जास्तीत जास्त गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या शर्यतीत वाळूज पोलिसांनी चक्क  मरण पावलेल्या रेकॉर्डवरील तीन गुन्हेगारांवरच प्रतिबंधात्मक (चॅप्टर केस) कारवाई केल्याचे समोर आले.  

निवडणुकीत कोणतीही गडबड होऊ नये, याकरिता  रेकॉर्डवरील अवैध दारू विक्रेते, जुगार अड्डे चालविणारे, तसेच हाणामारीचे गुन्हे असलेल्या व्यक्तींविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी सर्व ठाणेदारांना दिले होते. विशेष म्हणजे रोजच्या रोज केलेल्या कारवाईचा अहवाल पोलीस आयुक्तांमार्फत निवडणूक आयोगाला पाठविला जात असे. १० मार्च रोजी आचारसंहिता लागू झाली तेव्हापासून या कारवाई वेग वाढला. जास्त प्रतिबंधात्मक केसेस करण्यावर ठाणेदारांचा भर होता. त्यात  वाळूज पोलिसांनी मात्र चक्क मरण पावलेल्या तीन जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून चॅप्टर केस केली.  

दरम्यान, याविषयी वाळूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप गुरमे यांना विचारले असता ते म्हणाले की, आमच्या हद्दीतील अनेक गुन्हेगार गायब आहेत. निवडणूक कालावधीत मृतावर प्रतिबंधात्मक कारवाई झाली असल्यास याबाबत चौकशी केली जाईल.

उदाहरण क्रमांक १सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बकवालनगर येथील मिलिंद रावसाहेब थोरात हे अर्धांगवायूच्या आजारामुळे सहा महिन्यांपूर्वी मरण पावले. त्यांच्याविरोधात वाळूज पोलिसांनी २२ मार्च रोजी चॅप्टर केस क्रमांक ५८/२०१९ ही एसीपी छावणी यांच्याकडे दाखल केली. मिलिंद थोरात यांच्याविरोधात पोलिसांच्या रेकॉर्ड काही गुन्हे होते.

उदाहरण क्रमांक २वाळूजमधील साठेनगर येथील गोपाल उमेश पवार यांचा सुमारे दीड वर्षापूर्वी भेंडाळा फाट्याजवळ रस्ता अपघातात मृत्यू झाला. असे असताना ते हयात आहेत अथवा नाही, याबाबत शहानिशा न करता वाळूज पोलिसांनी त्यांच्याविरोधात २२ मार्च रोजी चॅप्टर केस क्रमांक ५४/२०१९ ही दाखल केली. 

उदाहरण क्रमांक ३रांजणगाव परिसर, एकतानगरातील हयात नसलेल्या एका व्यक्तिविरोधात वाळूज पोलिसांनी चॅप्टर केस एसीपी कार्यालयास पाठविली होती. त्याच्याविरोधात अवैध दारू विक्रीच्या गुन्ह्याची वाळूज ठाण्यात नोंद होती. 

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Aurangabadऔरंगाबाद