शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

मराठवाड्यात बोंडअळीची सर्वाधिक नुकसानभरपाई औरंगाबाद जिल्ह्याला मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 16:54 IST

राज्य सरकारने नुकसानभरपाईची एकूण रक्कम जाहीर केली असून, थेट शेतकऱ्यांच्या खात्यात ती जमा होणार आहे.

ठळक मुद्देराज्य सरकारने कापूस पीक नुकसानभरपाईची आकडेवारी जाहीर केली आहे.मराठवाड्याचा विचार केल्यास सर्वाधिक २९६ कोटी रुपयांची नुकसानभरपाई औरंगाबाद जिल्ह्यास देण्यात आली आहे. 

औरंगाबाद : मागील खरीप हंगामात कपाशीवर पडलेल्या बोंडअळीने संपूर्ण मराठवाड्यात हाहाकार उडाला होता. शेतकरी हवालदिल झाले होते. सरकारने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी सर्व विरोधी पक्षांनी लावून धरली होती. अखेर राज्य सरकारने नुकसानभरपाईची एकूण रक्कम जाहीर केली असून, थेट शेतकऱ्यांच्या खात्यात ती जमा होणार आहे. यात मराठवाड्याचा विचार केल्यास सर्वाधिक २९६ कोटी रुपयांची नुकसानभरपाई औरंगाबाद जिल्ह्यास देण्यात आली आहे. 

राज्य सरकारनेकापूस पीक नुकसानभरपाईची आकडेवारी जाहीर केली आहे. कापसाची नुकसानभरपाई म्हणून ३ हजार २४६ कोटी ७७ लाख ४९ हजार रुपये देण्यात येणार आहेत. संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर यवतमाळ जिल्ह्यास ३४९ कोटी १७ लाख ७ हजार एवढी नुकसानभरपाई मिळाली आहे. दुसऱ्या क्रमांकावर २९६ कोटी २५ लाख रुपयांची भरपाई औरंगाबाद जिल्ह्यास मिळाली आहे; मात्र मराठवाड्याचा विचार केला तर सर्वाधिक नुकसानभरपाई औरंगाबादला मिळाली आहे.

यात बीड २५६ कोटी ९३ लाख, जालना २७५ कोटी ३७ लाख, नांदेड १७६ कोटी १२ लाख, लातूर ८ कोटी ६० लाख, परभणी १५७ कोटी ९७ लाख, हिंगोली ३६ कोटी ६० लाख, तर उस्मानाबाद १३ कोटी ५१ लाख रुपये. मराठवाड्यासाठी एकूण १२२१ कोटींची नुकसानभरपाई देण्यात आली आहे. सर्व रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. 

आधार क्रमांक नसेल तरकपाशीच्या नुकसानीपोटी ज्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यात येणार आहे, त्या शेतकऱ्याच्या आधार संलग्नित बँक खात्यामध्ये  थेट हस्तांतर पद्धतीने प्रदान करावी; परंतु एखाद्या शेतकऱ्याकडे आधार क्रमांक नसेल, तर तो लाभापासून वंचित राहू नये यासाठी अन्य पर्यायी व व्यवहार्य ओळखपत्राआधारे (उदा. आधार ओळख नोंदणी पावती, निवडणूक आयोगाने दिलेले मतदान ओळखपत्र, आयकर विभागाने दिलेले स्थायी लेखा क्रमांक (पॅन), वाहन परवाना, पारपत्र, बँकेची पुस्तिका) खातरजमा करून प्रदान करण्यात यावेत. 

राज्य सरकारचे आदेश१ - बोंडअळीमुळे कपाशीचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले त्यांना मिळणार आर्थिक मदत. २ - आर्थिक मदतीची रक्कम थेट संबंधित शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होणार. ३ - कोणत्याही बँकेने मदतीच्या रकमेतून कोणत्याही प्रकारची वसुली करू नये. ४ - मिळालेल्या नुकसानभरपाईसह लाभार्थ्यांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी. ५ - शासनाकडून ३ समान हप्त्यांमध्ये जिल्ह्यांना रक्कम मिळेल; पण शेतकऱ्याला संपूर्ण रक्कम एकाच वेळी देण्यात यावी. 

टॅग्स :FarmerशेतकरीcottonकापूसMarathwadaमराठवाडाState Governmentराज्य सरकार