शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्ह्यावर दुष्काळाची छाया; प्रशासकीय यंत्रणा सतर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 15:20 IST

येणारा काळ पाण्याच्या टंचाईमुळे प्रचंड त्रासदायक जाण्याची परिस्थिती जिल्ह्यात आहे

ठळक मुद्देविभागीय आयुक्तांनी घेतली बैठक घरकुल, जलयुक्तला गती देण्याचे आदेश 

औरंगाबाद : जिल्ह्यातील ८ तालुके गंभीर स्वरूपाच्या दुष्काळाच्या छायेखाली आहेत. येणारा काळ पाण्याच्या टंचाईमुळे प्रचंड त्रासदायक जाण्याची परिस्थिती असून, त्या अनुषंगाने यंत्रणेला सतर्क करण्यासाठी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांसाठी असलेल्या सर्व योजनांची उजळणी घेण्यात आली. 

पुरवठा विभाग, कृषी विभाग, घरकुल योजना विभाग, रोजगार हमी अंतर्गत येणाऱ्या विविध योजनांची आजवरची प्रगती आणि येणाऱ्या सहा महिन्यांत करावयाची कामे, याबाबत संबंधित विभागांना डेडलाईन ठरवून देण्यात आली. घरकुल योजनेसाठी जिल्ह्याला देण्यात आलेले उद्दिष्ट ३७ टक्के पूर्ण झाले आहे. ६२ टक्के घरकुल योजनेची कामे अपूर्ण आहेत. खुलताबाद वगळता सर्व तालुक्यातील घरकुलांची कामे अपूर्ण पडलेली आहेत. ३१ डिसेंबरपर्यंत रखडलेली कामे पूर्ण करावीत, यासाठी गृहनिर्माण अभियंते व अतिरिक्त मनुष्यबळाचा वापर करण्याच्या सूचना करण्यात आल्या. जलयुक्त शिवार योजनेतील ९३ टक्के गावांतील कामे पूर्ण झाल्याचा दावा संबंधित अधिकाऱ्यांनी बैठकीत केला. १५ डिसेंबरपर्यंत उर्वरित कामे पूर्ण करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले. 

मागेल त्याला शेततळे या योजनेअंतर्गत राज्यात जिल्हा आघाडीवर आहे. वैजापूर तालुक्यात सर्वाधिक शेततळी बांधण्यात आली आहे. प्रत्येक कृषी सहायकावर येणाऱ्या काळात २० शेततळे बांधण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. येणाऱ्या पावसाळ्यापर्यंत जिल्ह्यात ६५ हजार शेततळी होतील, असा दावा याप्रसंगी करण्यात आला. 

अनुदानासाठी शेतकऱ्यांचे हेलपाटेदुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनांची उजळणी केली जात असताना गंगापूरमधून आलेले शेतकरी कृषी अधीक्षकांचा सकाळपासून पाठपुरावा करीत होते. गायी घेण्यासाठी कृषी विभागाने लाभार्थ्यांसाठी ५० टक्के योजना कार्यान्वित केली. मुठ्ठेवडगाव येथील २४ शेतकऱ्यांनी पश्चिम महाराष्ट्रातून गायी खरेदी केल्या. त्या गायींचा विमा उतरविणे, त्यांची तपासणी करणे, कृषी विभागाकडे अहवाल सादर करण्यात प्रत्येकाचे ८ हजार खर्च झाले. ४० हजारांची एक गाय, अनुदान मिळणार २० हजारांचे त्यात सरकार यंत्रणेच्या खाबुगिरीत गेले ८ हजार रुपये, अशी परिस्थिती असताना तालुका कृषी अधीक्षकाने शेतकऱ्यांना औरंगाबादला पाठविले. औरंगाबाद कृषी अधीक्षकांनी आज दिवसभर शेतकऱ्यांना बैठकीमुळे फिरविले. अनुदानातील अर्धी रक्कम मिळण्यापूर्वीच खर्च झाल्याचे शेतकरी महेश खेडकर, कचरू खेडकर यांनी सांगितले. 

टॅग्स :droughtदुष्काळAurangabadऔरंगाबादAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद