शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

औरंगाबाद जिल्ह्यात काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांची नावे जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 18:10 IST

विधानसभा निवडणुकीसाठी चाचपणी

ठळक मुद्दे‘वंचित’ बरोबर आघाडी करण्याची तयारीसोशल इंजिनिअरिंगवर राहणार भर

औरंगाबाद : जिल्ह्यातील नऊही मतदारसंघांसाठी काँग्रेसने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविले होते. असे अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी दुपारी पत्रपरिषद घेऊन जिल्हा काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष अनिल पटेल व शहर काँग्रेसचे अध्यक्ष नामदेव पवार यांनी ही नावे जाहीर केली. ती अशी :

सिल्लोड मतदारसंघ- प्रभाकर पालोदकर, श्रीराम महाजन, सुनील काकडे, विजय दौड, कैसर आझाद, राजेश मानकर, भास्कर घायवट. कन्नड- संतोष कोल्हे, नामदेव पवार, नितीन पाटील, अशोक मगर, अनिल सोनवणे, बाबासाहेब मोहिते.फुुलंब्री- डॉ. कल्याण काळे, अनिल मानकापे, तारा उकिर्डे.पैठण- अनिल पटेल, विनोद तांबे, बाळासाहेब भोसले, शेख तय्यब शेख बाबा.गंगापूर- किरण पाटील डोणगावकर, सय्यद कलीम.वैजापूर- पंकज ठोंबरे, प्रशांत सदाफळ.

यानंतर नामदेव पवार यांनी औरंगाबाद शहराच्या तीन मतदारसंघांतील इच्छुकांची नावे जाहीर केली. ती अशी :औरंगाबाद पूर्व- इब्राहिम पटेल, इब्राहिम पठाण, जीएसए अन्सारी, मोहसीन अहमद, अशोक जगताप, सरताज पठाण, अहमद हुसेन.औरंगाबाद पश्चिम- डॉ. जितेंद्र देहाडे, चंद्रभान पारखे, महेंद्र रमंडवाल, पंकजा माने, जयप्रकाश नारनवरे, राघोजी जाधव, जयदीप झाल्टे, सतीश शिरसाट, रमेश शिंदे, प्रदीप शिंदे, साहेबराव बनकर.औरंगाबाद मध्य- मोहंमद हिशाम उस्मानी, सागर मुगदिया, मशरूर खान, मो. अय्युब खान, युसूफ खान.या तिन्ही मतदारसंघांत आणखी काही अर्ज येणार असल्याची शक्यता पवार यांनी वर्तवली. 

यावेळी अनिल पटेल यांनी सिल्लोड तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी श्रीराम महाजन यांची नियुक्ती जाहीर केली. लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांवर कारवाई होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून समीर सत्तार यांच्याजागी आता जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून पंकज ठोंबरे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचेही पटेल यांनी सांगितले. अनिल पटेल यांनी सांगितले, २००९ च्या निवडणुकीतील जिल्ह्यातला ३/६ असा फार्म्युला राहील. पण पैठण यावेळी काँग्रेससाठी सुटायला पाहिजे, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. सिल्लोड तालुका काँग्रेस कार्यकारिणी बदलण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेस विलास औताडे, मुजफ्फर खान, डॉ. पवन डोंगरे, मीर हिदायत अली, अरुण शिरसाट, मीर हिदायत अली, संतोष भिंगारे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. 

सोशल इंजिनिअरिंग करू.... विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी काँग्रेसचा भर सोशल इंजिनिअरिंगवर राहील. आमच्या मतदारसंघवार बैठका झाल्या आहेत. पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या बाबतीत चार दिवसांनंतर व्यापक बैठक आयोजित करून डॉक्टर, वकील व बुद्धिवंतांची मते जाणून घेतली जाणार आहेत. काँग्रेसची मानसिकता वंचित बहुजन आघाडीबरोबर आघाडी करण्याची आहे. वंचित बहुजन आघाडीच्याही कार्यकर्त्यांची दिसते, पण याबाबतीत श्रेष्ठीच निर्णय घेतील, असे नामदेव पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. वंचित बहुजन आघाडीबरोबरची आघाडी एमआयएम सोडून झाली पाहिजे, असे मत पवार यांनी मांडले. 

पक्ष जी निवडणूक लढवायला सांगेल, ती लढवणार औरंगाबाद -जालना स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या आमदारकीची माझी मुदत संपत आहे. त्यानंतर विधानसभेच्याही निवडणुका होत आहेत. लोकसभा निवडणुकीत पराभूत झालो असलो तरी मी मैदान सोडलेले नाही. पक्षाच्या आदेशाचे पालन करणारा मी कार्यकर्ता आहे. पक्षाने स्थानिक स्वराज्य मतदारसंघाची निवडणूक लढायला सांगितल्यास ती मी लढेन. पक्षाला असे वाटले की, मी विधानसभेची निवडणूक लढवावी, त्यालाही मी तयार आहे, अशी भूमिका आजच्या पत्रकार परिषदेत आमदार सुभाष झांबड यांनी व्यक्त केली.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाAurangabadऔरंगाबादcongressकाँग्रेस