शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

सकल मराठा समाजाची सोमवारी औरंगाबाद जिल्हा बंदची हाक

By बापू सोळुंके | Updated: September 2, 2023 20:53 IST

मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत निर्णय: जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याचा निषेध

बापू सोळुंके

छत्रपती संभाजीनगर: मराठा समाज आंदोलकांवर पोलिसांनी शुक्रवारी केलेल्या अमानुष हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी औरंगाबाद जिल्हा बंद पुकारण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत शनिवारी सर्वानुमते घेण्यात आला. या बंद मध्ये व्यापारी महासंघ आणि सामाजिक संघटनांनी आपली दुकाने बंद ठेवून सहभाग नाेंदवावा, असे आवाहन यावेळी विनोद पाटील यांनी केले.

सकल मराठा समाजाची बैठक शनिवारी एपीआय कॉर्नर येथील हॉटेलमध्ये पार पडली. या बैठकीत अभिजीत देशमुख, किशोर चव्हाण, प्रा. शिवानंद भानुसे, राजू थिटे, सुनील कोटकर, ज्ञानेश्वर गायकवाड, सचीन हावळे पाटील, लक्ष्मण शिरसाट,सुरेश वाकडे,मनोज गायके,प्रा. चंद्रकांत भराट, राजेंद्र दाते , मछिंद्र देवकर, ॲड. सुवर्णा मोहिते, प्रा. मनिषा पाटील, डॉ. दिव्या पाटील, सुकन्या भोसले, रेखा वाहटुळे, मंगेश साबळे, सचीन मगर, किशोर दहिहंडे आदींनी मनोगत व्यक्त केली.

विनोद पाटील म्हणाले की, मराठा आरक्षण रद्द होऊन पावणे दोन वर्ष होत आहे मात्र आधीच्या व आताच्या सरकारने काहीही केले नाही. किशोर चव्हाण म्हणाले की,मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात विधी विभागाने मे महिन्यात नियुक्त केलेल्या समितीने २९ ऑगस्ट पर्यंत अहवाल देणे अपेक्षित होते.मात्र या कालावधीत या समितीने एकही बैठक घेतली नाही. यावरून मराठा समाजाबद्दल सरकारची उदासिनता दिसत आहे.

- हल्ल्याचा निषेध, एस.पी.ला बडतर्फ करा आणि आरक्षणाचा प्रश्न सोडवा, यामागणीसाठी बंद-लाठीहल्ला करण्याचे आदेश देणाऱ्या पोलीस अधीक्षकांना निलंबित करा.

- या घटनेला जबाबदार उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा.- आंदोलकांवरील गुन्हे रद्द करावे.

-- महिलांवर लाठीहल्ला करणाऱ्या पोलिसांवर विनयभंगाचा गुन्हा नोंदवावा.--यापुढे मराठा क्रांती मूक मोर्चा ऐवजी बोलका मोर्चा काढला जाणार

-- कोणीही मराठा क्रांती मोर्चाचा समन्वयक हे पद न वापरता मराठा समाज सेवक म्हणावे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMaratha Reservationमराठा आरक्षणmarathaमराठा