शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जि. प. अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया थांबवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2020 03:38 IST

आज पुन्हा होणार फेरमतदान; एका मताच्या मोजणीवरून उडाला गोंधळ

औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर यांची बंडखोरी आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे समर्थक ६ सदस्यांनी शिवसेनेच्या विरोधी पवित्रा घेतल्यामुळे शुक्रवारी राजकीय नाट्य घडले. एका मताच्या मोजणीवरून उडालेल्या गोंधळामुळे पीठासीन अधिकाऱ्यांनी निवडणूक प्रक्रियाच तहकूब केली. ही तहकूब सभा शनिवारी दुपारी २ वाजता पुन्हा घेऊ न, त्यात फेरमतदान घेण्यात येईल, अशी माहिती पीठासीन अधिकारी तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी भास्कर पालवे यांनी दिली.सत्ताधारी महाविकास आघाडीच्या सत्ता वाटपामध्ये अध्यक्षपद काँग्रेसला आणि उपाध्यक्षपद शिवसेनेला देण्याचा निर्णय मुंबईत दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतला होता. यानुसार काँग्रेसकडून अध्यक्षपदासाठी मीना शेळके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याच वेळी शिवसेनेच्या विद्यमान अध्यक्षा अ‍ॅड. देवयानी डोणगावकर यांनीही अर्ज घेतला होता. परंतु शिवसेना जिल्हाप्रमुख आ. अंबादास दानवे यांनी त्यांचा अर्ज फाडून टाकला. त्यामुळे देवयानी यांचे पती कृष्णा पाटील डोणगावकर यांच्यासोबत त्यांची वादावादी झाली. तेव्हाच अ‍ॅड. डोणगावकर बंडखोरी करणार असल्याचे स्पष्ट झाले.मीना शेळके, भाजपच्या अनुराधा चव्हाण आणि शिवसेना बंडखोर अ‍ॅड. डोणगावकर यांनी उमेदवारी दाखल केली. उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून शुभांगी काजे, भाजपकडून लहुजी गायकवाड आणि राज्यमंत्री सत्तार समर्थक काँग्रेसचे बंडखोर किशोर बलांडे यांनी उमेदवारी दाखल केली. शिवसेनेच्या बंडखोर अ‍ॅड. डोणगावकर यांनी राज्यमंत्री सत्तार समर्थक ६ सदस्यांना सोबत घेतले. त्याच वेळी भाजपशी संधान साधून अध्यक्षपदाला पाठिंबा दिल्यास उपाध्यक्षपदासाठी भाजपला मदत करण्याचे ठरले.यानुसार प्रत्यक्ष सभेला सुरुवात झाल्यानंतर अ‍ॅड. डोणगावकर यांनी बंडखोरी कायम ठेवली. भाजपच्या अनुराधा चव्हाण यांचाही अर्ज कायम होता. मात्र भाजपच्या सर्वच सदस्यांनी अ‍ॅड. डोणगावकर यांना समर्थन दिले. हात उंचावून मतदान करताना शिवसेनेच्या सदस्य मोनाली राजेंद्र राठोड यांनी मीना शेळके यांच्या बाजूने हात उंचावला. मात्र त्यानंतर त्यांनी सही करताना नकार दिला, अशी चर्चा आहे.यावरून सभागृहात प्रचंड गोंधळ उडाला. अनेक सदस्यांनी पीठासीन अधिकाऱ्यांच्या समोर जाऊन गोंधळ घातला. मोनाली राठोड यांचे मत मीना शेळके यांच्या बाजूने धरण्याची मागणी केली.जळगाव जि़ प़ भाजपने राखलीजळगाव : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीच्या अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादी व काँग्रेसचा प्रत्येकी एक सदस्य फोडत भाजपने जिल्हा परिषदेवर सत्ता कायम राखली़ ऐनपूर-खिरवड गटाच्या रंजना पाटील यांची अध्यक्षपदी तर नशिराबाद भादली गटाचे लालचंद पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड झाली़अध्यक्ष निवडीत रंजना पाटील यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार रेखा राजपूत यांचा तर उपाध्यक्षपदाच्या निवडीत लालचंद पाटील यांनी जयश्री पाटील यांचा अनुक्रमे तीन-तीन मतांनी पराभव केला़ भाजपच्या उमेदवारांना ३४ तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना ३१ मते मिळाली़

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद